Shahid Afridi, IND vs PAK: शाहिद आफ्रिदी जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी आणि चौकार-षटकारांच्या आतषबाजीसाठी ओळखला जायचा. भारताविरूद्धच्या सामन्यांमध्ये तो जीवाचं रान करून खेळायचा. त्याची ही वृत्ती खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर कायम दिसून आली आहे. भारताबद्दल विविध वक्तव्यांमुळे आफ्रिदी कायम चर्चेत असतो. इतर वेळी शाहिद आफ्रिदी जे वक्तव्य करतो त्यामुळे भारतीय चाहते संतापतात. पण यावेळी आफ्रिदी जे काही बोलला त्यावरून त्याने फक्त भारतीय चाहतेच नव्हे, तर पाकिस्तानी फॅन्सही अचंबित झाले.
शाहिद आफ्रिदी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर बोलला. आपल्या या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, त्याने हे वक्तव्य कोणत्याही टीव्ही किंवा कॅमेऱ्यावर नसून सोशल मीडियावर दिले आहे. आशिया चषक स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत त्याला विचारण्यात आले होते की, हा सामना कोण जिंकणार? याबाबत उत्तर देताना त्यांने असं काही उत्तर दिलं की त्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
शाहिद आफ्रिदीने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भारत-पाकिस्तान सामन्यावर आपले मत मांडले. एका क्रिकेट चाहत्याने त्याला भारत-पाक सामन्याच्या निकालावर प्रश्न विचारला, त्याचे उत्तर देताना त्याने वेगळाच 'ट्विस्ट' आणला. इतर वेळी थेट पाकिस्तानी संघाची बाजू घेणारा आफ्रिदी यावेळी मात्र काहीसा वेगळ्या उत्तराच्या मूड मध्ये दिसला. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात सर्वात कमी चुका करणारा संघ जिंकेल, असं विचित्र उत्तर त्याने दिले.
शाहिद आफ्रिदीच्या या उत्तरानंतर सगळेच थक्क झाले. कारण, त्याच्याकडून अशा उत्तराची कोणालाच अपेक्षा नव्हती. तो एका संघाचे नाव घेईल याची सर्वांना खात्री होती आणि तो संघ पाकिस्तान असेल असेही साऱ्यांना वाटत होते. पण, या विधानानंतर शाहिद आफ्रिदीच्या मनात कुठेतरी पाकिस्तान पराभूत होण्याची भीती आहे की काय अशीची चर्चा सोशल मीडियावर दिसून आली.
Web Title: India vs Pakistan in Asia Cup 2022 winner prediction Shahid Afridi reply to fan on twitter shocked everybody
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.