नवी दिल्ली : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून १५ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वचषकात भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांचा सामना मुंबईत होईल. मात्र, पाकिस्तानविरुद्ध उपांत्य सामना झाल्यास भारतीय संघाला कोलकात्याला जावे लागेल. विश्वचषकाआधी रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात एकूण तीन सामने रंगण्याची शक्यता आहे. अ गटात भारत, पाक व नेपाळचा आहे; तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश व श्रीलंका आहेत.
दोन्ही गटांतील प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. त्यामुळे भारत-पाक सामना ठरला आहेच. त्यानंतर ‘सुपर फोर’ मध्ये भारत-पाक सामना जवळपास निश्चित आहे. यातील दोन उत्कृष्ट संघ स्पर्धेचा अंतिम सामना खेळतील. भारत आणि पाकने अंतिम फेरी गाठल्यास पुन्हा एकदा क्रिकेटचा हायव्होल्टेज सामना रंगेल.