मुंबई, आशिया चषक 2018 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषक स्पर्धेत सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला आहे. 15 महिन्यांनंतर हे संघ समोरासमोर येत असल्याने दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताने सहावेळा आशिया चषक उंचावला आहे, तर पाकिस्तानला दोनवेळाच अशी कामगिरी करता आली आहे. पण, सध्याच्या घडीला पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे. भारताला दुबळ्या हाँगकाँगविरुद्धच संघर्ष करावा लागला. पाकिस्तानविरुद्धही त्यांना कडवे आव्हान मिळणार आहे. पाकिस्तानचे चार खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतील.
फखर जमान - पाकिस्तान संघाचा हा सलामीवीर भारतीय गोलंदाजांवर भारी पडू शकतो. फखरने चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताविरुद्ध 106 चेंडूंत 114 धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता. याच वर्षी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 210 धावा चोपल्या होत्या. द्विशतक झळकावणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज आहे.
सामन्याची वेळ - सायंकाळी 5 वाजताथेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स