Join us  

India vs Pakistan, Jason Roy IPL 2022 : जेसन रॉयने Hardik Pandya च्या गुजरात टायटन्सला दिला धक्का, IPL मधून घेतली माघार पण PSL मात्र खेळला; भारत अन् पाकिस्तानी चाहत्यांमध्ये जुंपली

Jason Roy, IPL 2022: इतके वर्षे Mumbai Indians कडून खेळलेला Hardik Pandya आता Gujarat Titans संघाचे नेतृत्व करताना दिसणार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 10:07 PM

Open in App

Jason Roy, IPL 2022: इतके वर्षे Mumbai Indians कडून खेळलेला Hardik Pandya आता Gujarat Titans संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरातच्या संघाने लिलावाच्या आधीच त्याला करारबद्ध करून घेतलं होतं. मात्र स्पर्धेच्या आधीच त्यांच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर म्हणून ज्या खेळाडूवर गुजरात संघाचा भरवसा होता, त्या इंग्लंडच्या जेसन रॉयने (Jason) संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली. पण तो पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धेत मात्र खेळला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं.

इंग्लंडसाठी तडाखेबाज सलामी देणारा फलंदाज जेसन रॉय याने IPL 2022 मधून माघार घेतली. रॉयला यंदाच्या मेगालिलावात २ कोटींच्या मूळ किमतीवर गुजरात संघाने ताफ्यात घेतलं होतं. शुबमन गिलच्या साथीने तो ओपनिंग करेल असा गुजरात संघाचा प्लॅन होता. पण सुमारे दोन महिने बायो-बबलमध्ये राहावं लागणार या भीतीने त्याने स्पर्धेतून आधीच माघार घेतली. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत जेसन रॉय खेळताना दिसला होता. क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाकडून सर्वाधिक ३०३ धावाही त्याने केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. पण IPL मधून त्याने माघार घेतली. त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली. IPL फ्रँचाईसी अशा खेळाडूंची वर्तणूक विसरत नाहीत, अशी धमकीवजा कमेंट भारतीय चाहत्याने केली. तर, प्रत्येक खेळाडूने IPL खेळलंच पाहिजे असा कुठे नियम नाही, असं पाकिस्तानी चाहत्याने लिहिलं.

जेसन रॉयने दुसऱ्यांदा लिलावानंतर स्पर्धेतून घेतलीय माघार

जेसन रॉय याने दुसऱ्यांदा लिलावानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. या आधी IPL 2020 मध्ये त्याला दीड कोटींच्या मूळ किमतीवर दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतलं होतं. त्यावेळीही त्याने वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती.

टॅग्स :आयपीएल २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानहार्दिक पांड्यागुजरात टायटन्स
Open in App