India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. पण या सामन्यात एक क्षण असा आला होता की, सलामीवीर रोहित शर्मा आऊट होणार होता. पण पाकिस्तानच्या खेळाडूच्या एका चुकीमुळे रोहित वाचला. नेमके घडले तरी काय, ते जाणून घ्या...
ही घटना घडली ती सामन्याच्या दहाव्या षटकात. वहाब रियाझ यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू लोकेश राहुले तटवला. त्यानंतर रोहित आणि राहुल या दोघांनीही एक धाव घेतली. त्यानंतर रोहित दुसरी धाव घेण्यासाठी धावत आला. राहुलने दुसरी धाव घ्यायची नाही, हे वारंवार सांगत होता. पण ते न ऐकता रोहित धावत आला.
रोहित शर्मा धावत येत आहे, हे पाहून राहुलही थोडासा पुढे सरसावला. तोपर्यंत रोहित खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत आला होता. त्यावेळी रोहितला कळले की आपण धावचीत होऊ शकतो आणि त्यानंतर त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या खेळाडूने यावेळी राहुलच्या दिशेने थ्रो केला. पण हा थ्रो जर रोहितच्या दिशेने झाला असता तर तो बाद झाला असता. पण त्यानंतर रोहितने अर्धशतक झळकावले.
भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवातभारत आणि पाकिस्तान या सामन्यात सर्वच खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. पण या सामन्यामध्ये भारताने चौकारानिशी दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्माच्या बॅटमधून हा चौकार आला.
पाकिस्तानने नाणेफक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पहिलेच षटक भन्नाट टाकले. या षटकात आमीरने एकही धाव दिली नाही. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या षटकात मात्र भारताच्या धावसंख्येची सुरुवात ही चौकाराने झालेली पाहायला मिळाली.