India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान यांच्यातील आजच्या सामन्याचं वातावरणं आता तापू लागल आहे. या सामन्यावरील पावसाचे संकट सध्या तरी दूर होताना दिसत असलं तरी ढगाळ वातावरणामुळे थोडीशी धाकधुक आहेच. पण, आनंदाची बातमी अशी की खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले आहेत.
पाकिस्तानच्या कर्णधाराला 'घरचा' अहेर; काकांचा पाठिंबा भारतीय संघालाभारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही तासांत हा सामना सुरू होईल, अशी सध्या तरी शक्यता आहे. मँचेस्टर येथे सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील सहाही सामन्यात पाकिस्तानला नमवले आहे. त्यामुळे साहजिकच यंदाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानला नमवेल अशी अनेकांची इच्छा आहे. या अनेकांमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याचे काका मेहबूब हसन यांचाही समावेश आहे. आजच्या लढतीत भारताने बाजी मारावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
''वर्ल्ड कप ही महत्त्वाची स्पर्धा आहे. आशा करतो याही वेळेस भारताकडून पाकिस्तानचा पराभव व्हावा. प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे, परंतु भारत विजयी व्हावा ही अपेक्षा,''असं मत हसन यांनी व्यक्त केले. सर्फराजच्या कामगिरीविषयी ते म्हणाले,'' या सामन्यात सर्फराजकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तो माझा पुतण्या आहे. त्याने भारताविरुद्ध चांगली कामगिरी करावी. चांगली कामगिरी केल्यास त्याचे कर्णधारपद कायम राहील. पण, हा वर्ल्ड कप भारतानेच जिंकावा.''
भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तानचा संघ समतोल नाही, असेही ते म्हणाले.''भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू वर्ल्ड क्लास आहे. पाकिस्तान संघात तसे खेळाडू नाहीत. गोलंदाज प्रत्येक सामना जिंकून देऊ शकत नाहीत. फलंदाजांनीही योगदान द्यायला हवं,'' असंही त्यांनी नमूद केले.
भारतानं पाकला नमवल्यास रोनल्डोलाही होईल आनंद, वीरूनं सांगितलं कारण!वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत भारतीय संघ 6-0 अशा आघाडीवर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारा भारतीय संघ तिच विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. भारताने आज विजय मिळवल्यास जय पराजयाची आकडेवारी 7-0 अशी होणार आहे. ''भारत-पाकिस्तान हा नेहमीच मोठा सामना होतो. मग तो वर्ल्ड कप स्पर्धेतील असो किंवा जगाच्या पाठीवर कोठेही. तो महामुकाबलाच असतो,'' असे सेहवाग म्हणाला.
त्यानं पुढे सांगितले की,''भारत-पाकिस्तानचे चाहते कोठेही राहत असतील, परंतु ते रविवारी मँचेस्टर येथील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार हे नक्की. वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहिला, तर भारताचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. भारताने सहावेळा पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे आणि रविवारी या निकालाचीच पुनरावृत्ती होईल. भारतानं 7-0 अशी आघाडी मिळवल्याचा ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही आनंद होईल. कारण, त्याच्या जर्सीचा क्रमांक हा सात आहे.''