India Vs Pakistan, Latest News: बाप तो बापच; पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवून भारत 'सातवे आसमां पर'

पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:52 PM2019-06-16T23:52:10+5:302019-06-16T23:57:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: Father, father; India defeats Pakistan again on 'seventh Asam' | India Vs Pakistan, Latest News: बाप तो बापच; पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवून भारत 'सातवे आसमां पर'

India Vs Pakistan, Latest News: बाप तो बापच; पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवून भारत 'सातवे आसमां पर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : विश्वचषकात बाप हा बापच असतो, हे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. भारताने तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल कामगिरी करत आपण पाकिस्तानपेक्षा किती कसे सरस आहोत, हे दाखवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानला करता आला नाही आणि भारताने सातव्या विश्वचषकाच्या सामन्यातही पाकिस्तावर मात करत विजयी परंपरा कायम राखली. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही. डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तावर हा सातवा विजय ठरला.


भारताच्या ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानला पाचव्याच षटकात पहिला धक्का बसला. विजय शंकरने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच चेंडूवर भारताला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर फखर झमान आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानचा डाव सावरत शतकी सलामी दिली. पण कुलदीप यादवने बाबरला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. १ बाद ११७ वरून पाकिस्तानची अवस्था ६ बाद १६५ अशी अवस्था झाली आणि त्यांच्या हातून सामना निसटला. त्यानंतर काही वेळाने पाऊस पडला आणि पाकिस्तानला ४० षटकांत ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच बँड वाजवला. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 336 धावा करता आल्या.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कारण भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. रोहित शर्माने तर १४० धावा फटकावत पाकिस्तानच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. सलामीवीर लोकेश राहुलनेही यावेळी ५७ धावांची खेळी साकारली.

रोहितने या सामन्यात ११३ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १४० धावांची खेळी साकारली. या १४० धावांच्या खेळीनंतर रोहितने आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता. कोहलीने यावेळी ६५ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ७७ धावा केल्या.

Web Title: India vs Pakistan, Latest News: Father, father; India defeats Pakistan again on 'seventh Asam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.