India Vs Pakistan, Latest News: भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवात

भारत vs पाकिस्तान लाइव: रोहित शर्माच्या बॅटमधून हा चौकार आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 03:16 PM2019-06-16T15:16:25+5:302019-06-16T15:17:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: India begins with boundary | India Vs Pakistan, Latest News: भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवात

India Vs Pakistan, Latest News: भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान या सामन्यात सर्वच खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. पण या सामन्यामध्ये भारताने चौकारानिशी दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्माच्या बॅटमधून हा चौकार आला.


पाकिस्तानने नाणेफक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पहिलेच षटक भन्नाट टाकले. या षटकात आमीरने एकही धाव दिली नाही. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या षटकात मात्र भारताच्या धावसंख्येची सुरुवात ही चौकाराने झालेली पाहायला मिळाली.

विराट कोहली पाकविरुद्ध करणार 'हा' भीमपराक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे

 भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आज होणाऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. जर हा सामना झालाच, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे पाकविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. 

कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. जर आज त्यानं 57 धावा केल्यास तर 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरेल. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.

Web Title: India vs Pakistan, Latest News: India begins with boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.