India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : रोहित शर्मापाकिस्तानविरुद्दच्या सामन्यात द्विशतक झळकावणार, असे साऱ्यांना वाटले होते. पण चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला आणि त्याचे दीडशतकही हुकले. पण रोहितला हा फटका मारण्याचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेच दिल्याचे पाहायला मिळाले.
हसन अलीच्या ३९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहितने दमदार चौकार वसूल केला. या चौकारानंतर रोहित १४० धावांवर येऊन ठेपला होता. आता रोहित द्विशतक झळकावणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण रोहितने विराटचा सल्ला ऐकला आणि १४० धावांवर बाद होऊन तो तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या चेंडूवर रोहितने चौकार वसूल केला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला रोहित सामोरे जाण्यासाठी सज्ज होता. त्यावेळी कोहलीने रोहितला 'फाइन लेग'चा खेळाडू जवळ आला आहे, असे सांगितले. त्यानुसार रोहित दुसरा चेंडू 'फाइन लेग'ला मारायला गेला आणि आपला झेल वहाब रियाझच्या हाती देऊन माघारी परतला. कोहलीचा हा सल्ला रोहितला चांगलाच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट समालोचक संजय मांजरेकर यांनी निदर्शनास आणून दिली.
... अन् रोहित शर्मा आऊट होता होता वाचला...पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. पण या सामन्यात एक क्षण असा आला होता की, सलामीवीर रोहित शर्मा आऊट होणार होता. पण पाकिस्तानच्या खेळाडूच्या एका चुकीमुळे रोहित वाचला. नेमके घडले तरी काय, ते जाणून घ्या...
ही घटना घडली ती सामन्याच्या दहाव्या षटकात. वहाब रियाझ यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू लोकेश राहुले तटवला. त्यानंतर रोहित आणि राहुल या दोघांनीही एक धाव घेतली. त्यानंतर रोहित दुसरी धाव घेण्यासाठी धावत आला. राहुलने दुसरी धाव घ्यायची नाही, हे वारंवार सांगत होता. पण ते न ऐकता रोहित धावत आला.
रोहित शर्मा धावत येत आहे, हे पाहून राहुलही थोडासा पुढे सरसावला. तोपर्यंत रोहित खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत आला होता. त्यावेळी रोहितला कळले की आपण धावचीत होऊ शकतो आणि त्यानंतर त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या खेळाडूने यावेळी राहुलच्या दिशेने थ्रो केला. पण हा थ्रो जर रोहितच्या दिशेने झाला असता तर तो बाद झाला असता.
भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवातभारत आणि पाकिस्तान या सामन्यात सर्वच खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. पण या सामन्यामध्ये भारताने चौकारानिशी दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्माच्या बॅटमधून हा चौकार आला.
पाकिस्तानने नाणेफक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पहिलेच षटक भन्नाट टाकले. या षटकात आमीरने एकही धाव दिली नाही. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या षटकात मात्र भारताच्या धावसंख्येची सुरुवात ही चौकाराने झालेली पाहायला मिळाली.