IND Vs PAK Live : आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने विजय खेचून आणला. या दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या सामन्यात विराटने ५३ चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. या विजयानंतर मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेविराट कोहलीला सलाम ठोकत, कोहलीच्या खेळीचे कौतुक केले.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले. विराट आणि हार्दीकच्या भागीदारीने आमच्यासाठी खेळ बदलला. या दोघांनी चांगली खेळी केली. गोलंदाजांनी सामन्याची सुरूवात उत्कृष्ठ केली. "विराट आणि हार्दिक हे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी शांत राहून खेळी केली. तेच आमच्यासाठी चांगले ठरले. आमच्या पहिल्या सामन्या आम्ही आत्मविश्वास, आणि आम्ही ज्या प्रकारे जिंकलो ते आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे, असंही रोहित म्हणाला. यावेळी बोलताना रोहित शर्माने विराट कोहलीला सलाम ठोकला.
"हे विराटच्या सर्वोत्तम खेळांपैकी एक नाही तर त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार आहे, असही कर्णधार रोहित म्हणाला.
विराट कोहली, हार्दिक पांड्याने पाकिस्तानची जिरवली
पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात वाईट झाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश ( ४) , रोहित ( ४), सूर्यकुमार यादव ( १५) व अक्षर पटेल ( २) असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या १० षटकांत ११५ धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. १२व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना १५ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला ३० चेंडूंत ६० धावा विजयासाठी हव्या होत्या. India Vs Pakistan Live T20 Match
विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त सर्वाधिक ३७४९* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला ( ३७४१) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-२०त १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे. हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी अनुक्रमे १६ व १७ वे षटक अप्रतिम टाकले. आता भारताला १८ चेंडूंत ४८ धावा हव्या होत्या. शाहीनने टाकलेल्या १८व्या षटकात विराटने १७ धावा चोपल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. विराट-हार्दिकने ७५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. India Vs Pakistan Live T20 Match