India vs Pakistan Live Update Marathi : दीड-दोन तासांच्या बॅटींगनंतर पावसाने विश्रांती घेतली अन् ग्राऊंड्समन्सनी कठोर मेहनत घेऊन खेळपट्टी सुकवली. मैदान ओलं झाल्याने मोठ्या स्पंजने ते सुकवाले लागले. ग्राऊंड्समननी प्रचंड मेहनत घेतल्याने मैदान खेळण्यास योग्य झाले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून देताना १२१ धावांची सलामी दिली. पण, पाकिस्तानी गोलंदाजांना या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवण्यात यश मिळालं. पावसाने बॅटींग सुरू केली तेव्हा २४.१ षटकांत २ बाद १४७ धावांवर भारताचा खेळ थांबला होता, तीन तासांनी मॅच सुरू होईल असे चित्र निर्माण झाले होते. पण, पुन्हा पावसामुळे मैदान झाकावे लागले अऩ् अखेर सामना स्थगित करावा लागला.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर बाबर आजमने नाणेफेक जिंकून भारताला आयते कोलीत दिले. रोहित आणि शुबमन या जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी करातना पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला, तर शुबमनही ५२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला. २४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले.
साडेपाच वाजता पाऊस थांबल्याने ५.५७ ला कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं, परंतु ६.०२ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. ८ मिनिटांनी तो थांबला. ६.२२ वाजल्यानंतर षटकं कमी होत गेली. ७.३० वाजता मैदानाची पाहणी केली गेली आणि अम्पायर्सनी बराच वेळ घेतला. काही ठिकाणी त्यांनी ग्राऊंड्समन्सना पुन्हा रोलर फिरवण्यास सांगितला. अम्पायरनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केली. ८ वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी केली गेली आणि तेव्हा अम्पायर्सनी काही ओला पॅच निदर्शनास आणून दिला. पंख्यांनी ती पॅच सुकवण्याचे काम सुरू होते. ८.३०ला पुन्हा पाहणी केली गेली आणि अखेर ३४-३४ षटकांचा सामना होणार असल्याचे जाहीर केले. ९ वाजता पुन्हा मॅच सुरू होईल. पण, त्यापूर्वीच पुन्हा मुसधार पावसाची सुरूवात झाली आहे आणि आता मॅच होण्याची शक्यता मावळत चालली होती आणि तेच झाले. राखीव दिवशी उर्वरित मॅच होणार आहे.
Web Title: India vs Pakistan Live Update Marathi : Match has been called off and India will resume on the reserve day.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.