Join us  

भारत-पाकिस्तान मॅच राखीव दिवशी होणार; जाणून घ्या पाऊस उद्या काय रंग दाखवणार

India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे ही खूप मोठी चूक ठरताना दिसतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 9:51 PM

Open in App

India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे ही खूप मोठी चूक ठरताना दिसतेय... आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात होते. पण, पाकिस्तान यजमान असलेली ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार श्रीलंका व पाकिस्तानात झाली. पाकिस्तानातील सर्व सामने सुरळीत पार पडले, परंतु श्रीलंकेत पाऊस खोडा घालतोय.. IND vs PAK साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि आजचा सुपर ४ मधील सामना राखीव दिवशी खेळवावा लागणार आहे. पण, उद्या तरी ही मॅच होईल का?

डोकेफोडी! IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत फायनलमध्ये कसा पोहोचणार?

भारताची फलंदाजी सुरू असताना वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पाऊसही खेळाडूंची फिरकी घेताना दिसला अन् थोडी थोडी विश्रांती घेऊन पडला. ८.३० वाजता खेळपट्टीची पाहणी झाली अन् ९ वाजता मॅच सुरू होण्याचा निर्णय झाला. ३४-३४ षटकांची सामना खेळवण्याचं ठरलं. ग्राऊंड्समन्सनी अथक मेहनत घेऊन मैदान सुकवलेही. पण, अम्पायर्स शेवटची पाहणी करण्यासाठी मैदानावर आले अन् पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे मैदान पुन्हा झाकावे लागले. अखेर आजच्या दिवसाचा खेळ स्थगित करावा लागला. आता राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. 

 

दरम्यान, फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर बाबर आजमने नाणेफेक जिंकून भारताला आयते कोलीत दिले. रोहित आणि शुबमन यांनी  पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर  शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबला आहे.  

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App