Join us  

वादळी वाऱ्यासह पाऊस आला! भारताची फलंदाजी पुन्हा न झाल्यास पाकिस्तान समोर असेल 'हे' लक्ष्य

India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 5:01 PM

Open in App

India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. या दोघांच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड बनवण्यास सुरूवात केली, परंतु जोरदार पावसाने वाट लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने २४.१ षटकानंतर सामना थांबला आहे. 

रोहित शर्माची आज सचिन तेंडुलकरशी बरोबरी! शुबमन गिलसह पाकिस्तानविरुद्ध मोडले अनेक विक्रम

बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तिथेच तो फसला. रोहितने पहिल्याच षटकात षटकार खेचला अन् शुबमनने वैविध्यपूर्ण फटके मारले.  रोहित व शुबमन गिल दोघांनीही चांगली फटकेबाजी केली आणि पाकिस्तानच्या दोन्ही गोलंदाजांना हतबल बनवले. नसीमने टाकलेल्या ८व्या षटकात शुबमनचा झेल यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या इफ्तिखार अहमद यांनी टाकला.  आघाडीचे दोन गोलंदाज अपयशी ठरल्यावर हॅरीस रौफ व शादाब खानला आणले. पण, रोहितने शादाबला दोन खणखणीत षटकार खेचले. शुबमनने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर भारताने १३. २ षटकांत फलकावर शतक झळकावले. रोहितने शादाबच्या फुलटॉसवर षटकार खेचून ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ( रोहितने शादाबची केलेली धुलाई पाहा

शादाबच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) फहीम अश्रफच्या अफलातून झेलवर बाद झाला. विराट कोहली मैदानावर येताच बाबरने शाहीनला पुन्हा गोलंदाजीला आणले, परंतु त्याने शुबमनला बाद केले. शुबमन ५२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. ( IND vs PAK Live ScoreCard क्लिक करा

 

विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला. २४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. भारताच्या २ बाद १४७ धावा झाल्या आहेत. जर भारताने पुन्हा फलंदाजी न केल्यास पाकिस्तानसमोर २४ षटकांत २०६ धावांचे असेल लक्ष्य. ( Rain arrives with India 147-2 in 24.1 overs. If India do not bat again and Pakistan are given same overs, then Pakistan's target will be 206 in 24 overs)

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माशुभमन गिल
Open in App