Join us  

Video : रोहित शर्माने पहिल्याच षटकात आफ्रिदीचे वाभाडे काढले; जे कधीच कुणाला नव्हते जमले 

India vs Pakistan Live Update Marathi : बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांचे पुनरागमन झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 3:21 PM

Open in App

India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा आज सामना होतोय. बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांचे पुनरागमन झाले आहे.  श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) दुखापतीमुळे आज बाहेर बसावे लागले. मोहम्मद शमीलाही विश्रांती दिली गेलीय. भारतीय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसच्या पाठीला सराव करताना किंचितशी दुखापत जाणवली आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळत नाही. चार महिन्यापूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली गेली होती.  

Shreyas Iyer ला नेमकं काय झालं? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी? रोहित म्हणतो...

शाहीन आफ्रिदी VS रोहीत शर्मा यांच्यातला सामना पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. रोहितने ५ चेंडू खेळून काढले अन् सहावा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमापार पाठवला. नसीन शाहच्या पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलचा झेल उडाला होता आणि तो टीपण्याचा शाहीनने जीवतोडून प्रयत्न केला. रोहितने नसीमचाही चांगला समाचार घेतला अन् कव्हरच्या दिशेने खणखणीत चौकार खेचला. शुबमननेही हात मोकळे केले अन् शाहीनला मारलेला चौकार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. भारताच्या दोन्ही सलामीवीरांना आज आक्रमक पवित्रा स्वीकारलेला दिसला. त्यामुळे ३ षटकांत २३ धावा त्यांनी फलकावर चढवल्या. ( IND vs PAK Live ScoreCard क्लिक करा

शाहीनच्या पहिल्याच षटकात वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही फलंदाजाने षटकार खेचला नव्हता. तो पराक्रम आज रोहितने केला. यापूर्वी रोहितने वन डेत पहिल्या षटकात २०१८ ( वि. दक्षिण आफ्रिका ( मॉर्ने मॉर्कल)) आणि २०१९ ( वि. बांगलादेश ( मोर्ताझा) यांना षटकार खेचले आहेत. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माशुभमन गिल
Open in App