India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा आज सामना होतोय. बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. पण, भारताला इच्छा नसताना एक बदल करावा लागला आहे, कारण श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) दुखापत झालीय. सराव करताना श्रेयसची पाठ दुखायला लागली आणि त्यामुळे त्याचं पूर्वीची दुखापत पुन्हा डोकं वर काढतेय का, अशी चिंता वाटू लागलीय. श्रेयसने दुखापतीतून सावरल्यानंतर एकच सामना खेळला आहे.
''आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. फलकावर धावा चढवायच्या होत्या आणि या गोलंदाजांसमोर कशी फलंदाजी होतेय हेही पाहायचे होते. त्यामुळे नाणेफेकीचा काही फरक पडत नाही. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पण, निसर्गावर आपले नियंत्रण नसते आणि सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल आहेत. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल संघात आले आहेत. श्रेयस अय्यरच्या पाठीला किंचितशी दुखापत झालीय आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली गेलीय,'' असे रोहित शर्माने सांगितले.
भारतीय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसच्या पाठीला सराव करताना किंचितशी दुखापत जाणवली आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळत नाही. चार महिन्यापूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली गेली होती.
भारताचा संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह
पाकिस्तानचा संघ -फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ