दुबईः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा 'ऑल राउंडर' हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागल्यानं बदली खेळाडू म्हणून आलेला मनीष पांडे 'हिरो' झाला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदचा झेल त्यानं सीमारेषेवर असा टिपला की सगळेजण बघतच बसले.
शोएब मलिक आणि बाबर आझम यांची जोडी फुटल्यानंतर भारताच्या शिलेदारांमध्ये नवा जोश संचारला होता. अर्थात, सेट झालेला शोएब आणि कर्णधार सर्फराझ यांची जोडी जमली असती तर ती डोकेदुखी ठरू शकत होती. परंतु, केदार जाधव आणि मनीष पांडेनं भारताला सुखद धक्का दिला. केदारचा चेंडू हवेतून सीमापार धाडण्याचा प्रयत्न सर्फराझने केला होता. परंतु, मनीषनं सीमारेषेवर अफलातून कॅच घेतला. त्याच्या या कौशल्याला नेटकऱ्यांनी भरभरून दाद दिली.
Web Title: India vs Pakistan: Manish Pandey takes a stunner to remove Sarfraz Ahmed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.