IND vs PAK, Asia Cup 2023 Live Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर झाल्यापासून आशिया चषकात गोंधळाचे वातावरण आहे. आता काही तासांनंतर जेव्हा दोन्ही संघ कोलंबोमध्ये आमनेसामने येतील, तेव्हा हवामान कसे असेल, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. महत्त्वाची अपडेट म्हणजे या सामन्यावरील पावसाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. साखळी फेरीत कोणताही निकाल न लागल्याने सामना रद्द करण्यात आला. भारताच्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यावरही याचा परिणाम झाला. त्याचप्रमाणे या सामन्यातही पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती आहे.
पावसाची शक्यता किती टक्के?
हवामानाच्या अंदाजानुसार रविवारच्या सामन्यात पावसाची शक्यता ९० टक्के आहे. यामुळे सोमवार हा सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे, परंतु अंदाजानुसार राखीव दिवशी ९० टक्क्यांऐवजी १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये हवामान स्वच्छ झाले तर तो चमत्कारच घडेल.
राखीव दिवसाची सोय
भारत-पाक यांच्यातील साखळी सामन्यात पावसामुळे चाहत्यांचा आणि खेळाडूंचा हिरमोड झाला होता. सुपर-4 च्या सामन्यात मात्र चाहत्यांचा असा हिरमोड होणार नाही. कारण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास, काय होणार याबाबत माहिती देण्यात आली. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांशी सामने खेळले. दोनही सामन्यात पावसाने चाहत्यांना निराश केले. ही निराशा टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. म्हणूनच उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पण हवामानाचा अंदाज पाहता, दोन्ही दिवस पाऊस पडणार असल्याने क्रिकेटप्रेमींना खेळाचा कितपत आनंद लुटता येईल, याबाबत साशंकताच आहे.
शेवटच्या पाच सामन्यांची कामगिरी
भारताने शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत, तर पाकिस्तानी संघाच्या नावावर पाच पैकी पाच, म्हणजे शेवटचे पाच सामने जिंकण्याचा विक्रम आहे.