Join us  

India Vs Pakistan T20 Live :तू भारतीयांची दिवाळी गोड केलीस! विराट कोहलीची अविश्वसनीय खेळी अन् अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जोरदार कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 7:34 PM

Open in App

IND Vs PAK Live T20 Scoreboard :टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जोरदार कमबॅक केले. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने उत्कृष्ठ अशी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३१ धावांत आघाडीचे ४ फलंदाज गमावले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीनं संयमानं खेळ करताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या विजयानंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री अनुष्का शर्माने पोस्टमध्ये विराट कोहलीचे कौतुक केले आहे. "तुझा खूप अभिमान आहे तुझा, तु अमर्याद आहेस, तुझ्यावर कायमचे प्रेम आहे. आज तुझ्यामुळे दिवाळी गोड होणार आहे. तु आज लोकांच्या जीवनात आनंद आणला आहे, अशी भावनिक पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे. 

India Vs Pakistan T20 Live : आज पप्पा जीवंत असते तर... ! वडिलांच्या आठवणीने गहिवरला Hardik Pandya, ऑन एअर लहान मुलासारखा रडला

"तु आज रात्री लोकांच्या जीवनात खूप आनंद आणला आहेस, आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला! तू एक अद्भुत माणूस आहेस. तुझी जिद्द आणि विश्वास मनाला चटका लावणारा आहे, असंही अनुष्काने पोस्टमध्ये म्हटले आहे.

"मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना पाहिला आहे, आणि माझ्या मुलीला वाटत असेल आज आई अशी का नाचत आहे, हे समजण्यासाठी ती खूप लहान असली तरी एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री सर्वोत्तम खेळी खेळली होती. तो खूप कठीण टप्प्यातून गेला आहे. तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे, असंही अनुष्काने म्हटले आहे. अनुष्काच्या या पोस्टला अनेकांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 विराट कोहली, हार्दिक पांड्याने पाकिस्तानची जिरवली

पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात वाईट झाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश ( ४) , रोहित ( ४), सूर्यकुमार यादव ( १५) व अक्षर पटेल ( २)  असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या १० षटकांत ११५ धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. १२व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत  षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना १५ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला ३० चेंडूंत ६० धावा विजयासाठी हव्या होत्या. India Vs Pakistan Live T20 Match

विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त सर्वाधिक ३७४९* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला ( ३७४१) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-२०त १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला.  शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे. हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी अनुक्रमे १६ व १७ वे षटक अप्रतिम टाकले. आता भारताला १८ चेंडूंत ४८ धावा हव्या होत्या. शाहीनने टाकलेल्या १८व्या षटकात विराटने १७ धावा चोपल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. विराट-हार्दिकने ७५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. India Vs Pakistan Live T20 Match

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघपाकिस्तान
Open in App