India Vs Pakistan T20 Live : 'बीवी पाकिस्तानी, पर दिल है हिंदुस्थानी'! अमेरिकेतून पठ्ठ्या निम्म्या निम्म्या जर्सींत मॅच पहायला पोहोचला 

IND Vs PAK Live T20 Side Story: पाकिस्तान हा आपला शत्रू, युद्धात कित्येकदा हरविले आहेच पण खेळातही आपण कधी त्यांना हरवतो आणि फटाके फोडतो असे भारतीयांना होते. पाकिस्तानच्या बाजुनेही तशाच भावना असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 02:56 PM2022-10-23T14:56:17+5:302022-10-23T14:57:44+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Pakistan T20 Live : 'Biwi Pakistani, Par Dil Hai Hindustani'! Man came from America to watch the match in half - half jerseys of India, Pakistan trending | India Vs Pakistan T20 Live : 'बीवी पाकिस्तानी, पर दिल है हिंदुस्थानी'! अमेरिकेतून पठ्ठ्या निम्म्या निम्म्या जर्सींत मॅच पहायला पोहोचला 

India Vs Pakistan T20 Live : 'बीवी पाकिस्तानी, पर दिल है हिंदुस्थानी'! अमेरिकेतून पठ्ठ्या निम्म्या निम्म्या जर्सींत मॅच पहायला पोहोचला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया कपवेळी एका भारतीयानेपाकिस्तानची जर्सी घालून स्टेडिअममध्ये प्रवेश केला होता. त्याच्या या कृत्यावरून प्रचंड टीका झाली होती. त्याने यामागचे कारणही सांगितले होते. आता आणखी एक भारतीयाचा असाच काहीसा फोटो व्हायरल होत आहे. पण त्यामागचेही कारण मजेशीर आहे. 

पाकिस्तान हा आपला शत्रू, युद्धात कित्येकदा हरविले आहेच पण खेळातही आपण कधी त्यांना हरवतो आणि फटाके फोडतो असे भारतीयांना होते. पाकिस्तानच्या बाजुनेही तशाच भावना असतात. यामुळे या दोन्ही देशांमधील मॅच ही हायव्होल्टेजच होते. काहीही असले तरी भारताने पाकिस्तानचे स्वस्तात दोन खंदे विकेट घेत चांगली सुरुवात केलीय, परंतू पाकिस्तानही पुन्हा मॅचमध्ये परतला आहे. आता चर्चा होतेय ती या भारतीय-पाकिस्तानी फॅनची. 

मेलबोर्नच्या स्टेडिअममध्ये एका असा फॅन पोहोचला, ज्याने अर्धी जर्सी भारताची घातलेली तर अर्धी पाकिस्तानची. त्याला असे का केले असे विचारले असता, त्याने माझी पत्नी पाकिस्तानची असून मी भारतीय आहे. आणि अमेरिकेहून मी ऑस्ट्रेलियाला भारताला सपोर्ट करण्यासाठी पोहोचलो आहे, असे त्याने सांगितले. 'मेरी बीवी पाकिस्तानी, पर दिल है हिंदुस्थानी', असे या व्यक्तीने सांगितले. पत्नीने परवानगी दिलीय त्यामुळेच मी हा शर्ट घातला आहे, असेही तो पुढे म्हणाला. 

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची गणना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये केली जाते. सुमारे एक लाख चाहत्यांची बसण्याची व्यवस्था आहे. स्टेडिअम हाऊसफुल्ल आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय आपल्या देशाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. पाकिस्तानीही या बाबतीत मागे नाहीत.

Web Title: India Vs Pakistan T20 Live : 'Biwi Pakistani, Par Dil Hai Hindustani'! Man came from America to watch the match in half - half jerseys of India, Pakistan trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.