ट्वें-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्याही माघारीचे वृत्त येऊन धडकले आहे. BCCI ने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याचे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबतचे अपडेट्स अद्याप दिलेले नाहीत. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याशी २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर होणार आहे. त्यात पाकिस्तानी गोलंदाज हॅरीस रौफ ( Harris Rauf) याने थेट भारतीय संघाला चॅलेंज दिलं आहे.
वर्ल्ड चॅम्पियन्स होणार मालामाल; एकूण ४५ कोटी रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव
पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यात हॅरिस रौफने उल्लेखनीय कामगिरी करताना पाकिस्तानला मालिकेत पुनरागमन करून दिले. आता तो भारत-पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक आहे. बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून हॅरीस २०१९-२० या पर्वात खेळला होता आणि त्याने दमदार कामगिरी केली. त्याच जोरावर त्याने मेलबर्नवर होणाऱ्या लढतीत भारताला आव्हान दिलं आहे. मेलबर्न स्टार्सकडून खेळण्याचा अनुभव भारतीय गोलंदाजांना बाद करण्यासाठी कामी येईल, असे तो म्हणाला.
१६ पैकी १६ संघ झाले जाहीर, जग जिंकण्यासाठी सारेच सज्ज; भारतासमोर तगडे आव्हान
इंग्लंडविरुद्धच्या ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने ३-२ अशी आघडी घेतली आहे. या पाच सामन्यांत रौफने ८ विकेट्स घेतल्या आहेत. रौफ म्हणाला,''जर मी माझी सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर भारतीय फलंदाजांना मला खेळणं अवघड जाईल. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मी खूप उत्साही आहे, कारण तो सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. मला इथे कशी गोलंदाजी करायची याची कल्पना आहे. त्यामुळे भारताविरुद्ध कशी गोलंदाजी करायची, याचं प्लानिंग मी आतापासूनच सुरू केले आहे. ''
२०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेत २८ वर्षीय रौफने ८ विकेट्स घेतल्या होत्या. आशिया चषक २०२२ मध्येही त्याने ६ सामन्यांत ८ बळी टिपले होते. ''भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना नेहमीच प्रचंड दबावाचा असतो. मागच्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची प्रचिती मला आली. परंतु आशिया चषकातील दोन सामन्यांत तो दबाव जाणवला नाही. मला सर्वोत्तम द्यायचेय हे मला माहित्येय,''असेही रौफ म्हणाला.
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आकडेवारी