Join us  

India Vs Pakistan T20 Live : ५ चेंडूंत २ विकेट्स! Hardik Pandya-सूर्यकुमार यादव जोडीने पाकिस्तानचे वाजवले बारा, निम्मा संघ ९८ धावांत तंबूत, Video

IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानचा संघ ज्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडत होता, त्यांना भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने जमिनीवर आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 2:53 PM

Open in App

IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानचा संघ ज्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडत होता, त्यांना भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने जमिनीवर आणले. पण, इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. रन आऊटच्या हुकलेल्या संधीमुळे या दोघांना डाव सावरण्यासाठी वेळ मिळाला. अक्षर पटेलचा अहमदने चांगला चोपून काढला. मोहम्मद शमीने ही जोडी तोडली आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) एकाच षटकात दोन धक्के दिले. भारताने पुनरागमन केले. Ind vs Pak Live T20 Match

अर्शदीप सिंगचा विश्वविक्रम! पाकिस्तानच्या ओपनर्सची नाचक्की करून ठरला जगात भारी, Video

भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण निर्माण केले आणि त्यानंतर अर्शदीप सिंगने बारा वाजवले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने कर्णधार बाबर आजमला LBW केले. बाबर गोल्डन डकवर माघारी जाताना पाकिस्तानी चाहते गप्प झाले होते. अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद रिझवानला बाऊन्सरवर बाद केले. रिझवान १२ चेंडूंत ४ धावा करून फाईन लेगवर भुवनेश्वरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. एकाच सामन्यात पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावेत बाद करणारा अर्शदीप हा जगातील पहिला गोलंदाज ठरला.  आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघांमध्ये सर्वाधिक गोल्डन डकवर बाद होणाऱ्या कर्णधारांमध्ये बाबरने ( ३ वेळा) तिसरे स्थान पटकावले.  India Vs Pakistan Live T20 Match अश्विनच्या कॅरम बॉलवर अहमदने खणखणीत षटकार खेचून मसूदसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अहमदने हळुहळू फटकेबाजीला सुरुवात केली आणि अक्षर पटेलच्या चेंडूवर त्याने तीन षटकार खेचले. अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अक्षरने टाकलेल्या १२ व्या षटकात २१ धावा कुटल्या. पण, मोहम्मद शमीने पुढच्या षटकात वचपा काढला आणि ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करणाऱ्या अहमदला LBW केले. हार्दिकने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना शादाब खानला ( ५) बाद केले. सूर्यकुमार यादवने चांगला झेल घेतला. त्याच षटकात हार्दिक व सूर्यकुमार या जोडीने तशाच पद्धतीने हैदर अलीची ( २) विकेट घेतली. पाकिस्तानचा निम्मा संघ ९८ धावांत तंबूत परतला. Ind vs Pak Live Scoreboard

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App