IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानचा संघ ज्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडत होता, त्यांना भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) जमिनीवर आणले. बाबर-रिझवान यांचा फॉर्म बराच बोलका होता. या दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्यात मागच्या वर्ल्ड कपमध्ये या दोघांनीच भारताला पराभूत केले होते. पण, आज अर्शदीपने त्यांना गुंडाळले. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करतोय आणि राष्ट्रगीत सुरू असताना तो भावनिक झालेला पाहायला मिळाला. ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. Ind vs Pak Live T20 Match
रोहित शर्माने मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला, राष्ट्रगीत सुरू असताना रडू लागला, Video Viral
भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण निर्माण केले आणि त्यानंतर अर्शदीप सिंगने बारा वाजवले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने कर्णधार बाबर आजमला LBW केले. बाबर गोल्डन डकवर माघारी जाताना पाकिस्तानी चाहते गप्प झाले होते. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने शान मसूदचा रन आऊट सोडला. विराटचा थ्रो चूकला अन् पाकिस्तानी चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद रिझवानला बाऊन्सरवर बाद केले. रिझवान १२ चेंडूंत ४ धावा करून फाईन लेगवर भुवनेश्वरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पाकिस्तानला १५ धावांवर दोन धक्के बसले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला २ बाद ३२ धावा करता आल्या. India Vs Pakistan Live T20 Match
एकाच सामन्यात पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावेत बाद करणारा अर्शदीप हा जगातील पहिला गोलंदाज ठरला. आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघांमध्ये सर्वाधिक गोल्डन डकवर बाद होणाऱ्या कर्णधारांमध्ये बाबरने तिसरे स्थान पटकावले. तिसऱ्यांदा तो गोल्डन डकवर बाद झाला. आरोन फिंच ( ४) व एम मोर्ताझा ( ४) हे आघाडीवर आहेत. शान मसूद व अफ्तिखार अहमद हे पाकिस्तानचा डाव सांभाळताना दिसले. सातव्या षटकात हार्दिक पांड्याला गोलंदाजीला आणले आणि त्याने पाकिस्तानी फलंदाजाला रन आऊट करण्यासाठी अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. चेंडू यष्टींवर आदळण्याआधीच फलंदाज क्रिजमध्ये पोहोचला. मसूद व अहमद यांची २८ धावांची भागीदारी मोहम्मद शमीने संपुष्टात आणली असे वाटले होते. आर अश्विनने फाईन लेगला अप्रतिम झेल टिपलेला, परंतु चेंडू त्याच्या हातात विसवण्यापूर्वी मैदानावर टप्पा पडला अन् मसूदला जीवदान मिळाले.Ind vs Pak live t20 Match, IND vs PAK Match scoreboard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"