India Vs Pakistan T20 Live : अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्याने पाकिस्तानला हादरवून टाकले; तरीही भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

IND Vs PAK Live T20 Scoreboard : एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 03:19 PM2022-10-23T15:19:53+5:302022-10-23T15:23:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Arshdeep Singh, Hardik Pandya take 3 wickets each, India needs 160 runs to win against Pakistan in the Super 12 | India Vs Pakistan T20 Live : अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्याने पाकिस्तानला हादरवून टाकले; तरीही भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

India Vs Pakistan T20 Live : अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्याने पाकिस्तानला हादरवून टाकले; तरीही भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND Vs PAK Live T20 Scoreboard : एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले. बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडणाऱ्या पाकिस्तानला अर्शदीपने जमिनीवर आणले.  इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला होता, परंतु मोहम्मद शमीने ही जोडी तोडली. त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) ३ धक्के देत भारताला कमबॅक करून दिले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील प्रेक्षकांचा उत्साह हा जगभरातील क्रीडा प्रेमींना ऊर्जा देणारा ठरला. Ind vs Pak Live T20 Match

 ५ चेंडूंत २ विकेट्स! Hardik Pandya-सूर्यकुमार यादव जोडीने पाकिस्तानचे वाजवले बारा, निम्मा संघ ९८ धावांत तंबूत, Video

भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण निर्माण केले आणि त्यानंतर अर्शदीप सिंगने बारा वाजवले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने कर्णधार बाबर आजमला LBW केले. अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद रिझवानला बाऊन्सरवर बाद केले. रिझवान १२ चेंडूंत ४ धावा करून फाईन लेगवर भुवनेश्वरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. एकाच सामन्यात पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावेत बाद करणारा अर्शदीप हा जगातील पहिला गोलंदाज ठरला.   India Vs Pakistan Live T20 Match


अश्विनच्या कॅरम बॉलवर अहमदने खणखणीत षटकार खेचून मसूदसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अहमदने हळुहळू फटकेबाजीला सुरुवात केली आणि अक्षर पटेलच्या चेंडूवर त्याने तीन षटकार खेचले. अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अक्षरने टाकलेल्या १२ व्या षटकात २१ धावा कुटल्या. पण, मोहम्मद शमीने पुढच्या षटकात वचपा काढला आणि ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करणाऱ्या अहमदला LBW केले. हार्दिकने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना शादाब खानला ( ५) बाद केले. सूर्यकुमार यादवने चांगला झेल घेतला. त्याच षटकात हार्दिक व सूर्यकुमार या जोडीने तशाच पद्धतीने हैदर अलीची ( २) विकेट घेतली. पाकिस्तानचा निम्मा संघ ९८ धावांत तंबूत परतला. Ind vs Pak Live Scoreboard

हार्दिकने आणखी एक धक्का देताना मोहम्मद नवाजला ( ९) बाद केले. भारताच्या अष्टपैलू खेळाडूने ४-०-३०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. १७व्या षटकात अर्शदीपला पुन्हा बोलावले गेले आणि त्याने अफलातून बाऊन्सर टाकून आसीफ अलीला ( २) बाद केले.  ९१ धावांवर २ विकेट्स असणाऱ्या पाकिस्तानने पुढील २९ धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ४ षटकांत २५ धावा देत १ विकेट घेतली. शान मसूदनेही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शाहीन आफ्रिदीने १९व्या षटकात अर्शदीपला ९२ मीटर लांब षटकार खेचला. अर्शदीपने त्याच्या ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. Ind vs Pak live t20 Match    

८ चेंडूंत १६ धावा करणाऱ्या शाहिनला २०व्या षटकात भुवीने बाद केले. पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Arshdeep Singh, Hardik Pandya take 3 wickets each, India needs 160 runs to win against Pakistan in the Super 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.