Join us  

India Vs Pakistan T20 Live : Arshdeep Singh ने पहिल्याच चेंडूवर बाबर आजमला 'Golden Duck' बनवले; पाकिस्तानी चाहते गप्प झाले, Video 

IND Vs PAK Live T20 Scoreboard :  क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 1:48 PM

Open in App

IND Vs PAK Live T20 Scoreboard :  क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. लाख-दीड लाख प्रेक्षकांची उपस्थिती या महामुकाबल्यासाठी मैदानावर आहेत आणि भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  रोहित शर्मा प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत युवा खेळाडू असलेला रोहित १५ वर्षांनंतर संघाचे नेतृत्व सांभाळतोय. ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट घेतली.

रोहित शर्माने मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला, राष्ट्रगीत सुरू असताना रडू लागला, Video Viral

 भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत. रोहितने आज मैदानावर पाऊल ठेवताच मोठा विक्रम नावावर केला. ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने २००७ ते २०२२ मध्ये खेळलेल्या ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३४ सामन्यांत ३८.५०च्या सरासरीने  ८४७ धावा केल्या आहेत. त्यात ८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ७९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.  India Vs Pakistan Live T20 Match

भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण निर्माण केले आणि त्यानंतर अर्शदीप सिंगने बारा वाजवले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने कर्णधार बाबर आजमला LBW केले. बाबर गोल्डन डकवर माघारी जाताना पाकिस्तानी चाहते गप्प झाले होते. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने शान मसूदचा रन आऊट सोडला. विराटचा थ्रो चूकला अन् पाकिस्तानी चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.India vs Pakistan T20 Int Live Match अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद रिझवानला बाऊन्सरवर बाद केले. रिझवान १२ चेंडूंत ४ धावा करून फाईन लेगवर भुवनेश्वरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पाकिस्तानला १५ धावांवर दोन धक्के बसले.  

पाहा विकेट

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२अर्शदीप सिंगभारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम
Open in App