IND Vs PAK Live T20 Scoreboard : ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली व हार्दिक पांड्या ही जोडी धावून आली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी आतापर्यंत ७०+ धावांची भागीदारी करताना दोन मोठे विक्रम नोंदवले. विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर हार्दिकने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नोंदवला. Ind vs Pak Live T20 Match
Out or not-out? वादग्रस्त निर्णय, रिझवानच्या हातात चेंडू नसतानाही Axar Patel ला दिले बाद; Video
पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात वाईट झाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश ( ४) , रोहित ( ४), सूर्यकुमार यादव ( १५) व अक्षर पटेल ( २) असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले. शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुल caught&bowled होता होता वाचला. नसीम शाहने टाकलेला चेंडू लोकेशेच्या बॅट लागून पॅडवर आदळला अन् नंतर यष्टींचा वेध घेतला. सातव्या षटकात अक्षर पटेलने मारलेला चेंडू बाबर आजमच्या हाती गेला. बाबरने चेंडू यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान याच्या हाती सोपवला अन् त्याने बेल्स उडवल्या. पण, या विकेटची त्यालाही खात्री नव्हती. तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली गेली आणि त्यात रिझवानचे ग्लोव्ह्ज जेव्हा यष्टींवर आदळले तेव्हा चेंडू त्याच्या हातात नव्हते. तरीही तिसऱ्या अम्पायरने अक्षरला बाद ठरवले. India Vs Pakistan Live T20 Match
विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या १० षटकांत ११५ धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. १२व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना १५ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला ३० चेंडूंत ६० धावा विजयासाठी हव्या होत्या.Ind vs Pak live t20 Match
विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त सर्वाधिक ३७४९* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला ( ३७४१) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-२०त १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे. India Vs Pakistan Live T20 Match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"