IND Vs PAK Live T20 Scoreboard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज अविश्वसनीय विजय मिळवला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३१ धावांत आघाडीचे ४ फलंदाज गमावले. जवळपास १ लाख प्रेक्षकांमध्ये पाकिस्तानी चाहत्यांचाच अधिक आवाज धुमू लागला. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीनं संयमानं खेळ करताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. तरीही अखेरपर्यंत भारत जिंकेल अशी फार कमी अपेक्षा राहिली होती. त्यात हार्दिक २०व्या षटकात माघारी परतला अन् पाकिस्तानी भलतेच खूश झाले.
Virat Kohli अखेरपर्यंत भिडला, विजयानंतर रडला; रोहित शर्माने खांद्यावर उचलून घेतला, Emotional Photo
३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् फुलटॉस चेंडूच्या हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ विकेट्सने सामना जिंकला.India Vs Pakistan Live T20 Match
हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला आणि विराटसह त्याची ७८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विराटने पाकिस्तानची जीरवली. विराटने ५३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. अश्विनच्या विजयी चौकारानंतर एकच जल्लोष झाला. विराटने आकाशाकडे एक बोट दाखवत सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. हार्दिक, भुवनेश्वर, सूर्यकुमार सर्वच विराटच्या दिशेने धावले. कर्णधार रोहित शर्माने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले.Ind vs Pak Live Scoreboard, India vs Pakistan T20 Int Live Match
हार्दिक म्हणाला, मी आता फक्त पप्पांचा विचार करतोय. माझंही माझ्या मुलावर खूप प्रेम आहे, पण माझ्या वडिलांनी जो त्याग आमच्यासाठी केला तो मी माझ्या मुलासाठी करू शकेन की नाही याची मला कल्पना नाही. मुलगा भविष्यात मोठा खेळाडू होईल की नाही, हे माहीत नसतानाही त्यांनी सहा वर्ष दुसऱ्या शहरात राहण्याचा निर्णय घेतला. तो केवळ माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आज ते असते, तर त्यांच्यापेक्षा आनंदी कुणीच नसतं. आजची खेळी ही त्यांना समर्पित.'' IND vs PAK Match scoreboard