India Vs Pakistan T20 Live : भारताने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; पाकवरील रोमहर्षक विजयामुळे तो दुर्लक्षित राहिला, ऑसींना धक्का

IND Vs PAK Live T20 Scoreboard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 08:51 PM2022-10-23T20:51:03+5:302022-10-23T20:51:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : History: India has the most wins in a calendar year in International cricket - 39. | India Vs Pakistan T20 Live : भारताने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; पाकवरील रोमहर्षक विजयामुळे तो दुर्लक्षित राहिला, ऑसींना धक्का

India Vs Pakistan T20 Live : भारताने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; पाकवरील रोमहर्षक विजयामुळे तो दुर्लक्षित राहिला, ऑसींना धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND Vs PAK Live T20 Scoreboard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय विजयाची नोंद केली. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  भारताने ३१ धावांत ४ फलंदाज गमावल्यानंतर पाकिस्तानला विजयाचे स्वप्न पडू लागले होते.  पण, विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीनं संयमानं खेळ करताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. तरीही अखेरपर्यंत भारत जिंकेल अशी फार कमी अपेक्षा राहिली होती. त्यात हार्दिक २०व्या षटकात माघारी परतला अन् पाकिस्तानी भलतेच खूश झाले. विराटने फ्री हिटवरील चेंडूवर बेल्स उडाल्यानंतर घेतलेल्या तीन धावा चतुराईच्या ठरल्या. या रोमहर्षक विजयात भारताने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आणि त्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. 

विराट कोहली अखेरपर्यंत भिडला, विजयानंतर रडला; रोहित शर्माने खांद्यावर उचलून घेतला, Emotional Photo

३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् फुलटॉस चेंडूच्या हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या.  फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला  आणि भारताने ४ विकेट्सने सामना जिंकला.

आज पप्पा जीवंत असते तर... ! वडिलांच्या आठवणीने गहिवरला Hardik Pandya, ऑन एअर लहान मुलासारखा रडला 

हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला आणि विराटसह त्याची ७८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विराटने पाकिस्तानची जीरवली. विराटने ५३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. अश्विनच्या विजयी चौकारानंतर एकच जल्लोष झाला. विराटने आकाशाकडे एक बोट दाखवत सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. हार्दिक, भुवनेश्वर, सूर्यकुमार सर्वच विराटच्या दिशेने धावले. कर्णधार रोहित शर्माने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
भारतीय संघाचा २०२२ या कॅलेंडर वर्षातील हा ३९ वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विजय ठरला. यापूर्वी भारताने २०१७मध्ये कॅलेंडर वर्षात ३७ विजय मिळवले होते. ऑस्ट्रेलियाने रिकी  पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ३० वन डे व ८ कसोटी जिंकून कॅलेंडर वर्षात ३८ विजयाचा विश्वविक्रम नोंदवला होता. आज तो भारतीय संघाने मोडला.  

Web Title: India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : History: India has the most wins in a calendar year in International cricket - 39.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.