India Vs Pakistan T20 Live : KL Rahul दुर्दैवीरित्या बाद झाला, भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर माघारी परतले; Video

एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 03:55 PM2022-10-23T15:55:47+5:302022-10-23T15:56:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : India lose KL Rahul early as Naseem Shah dismisses him for 4, Rohit Sharma out on 4 runs. India 10/2 vs Pakistan (159/8), Video | India Vs Pakistan T20 Live : KL Rahul दुर्दैवीरित्या बाद झाला, भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर माघारी परतले; Video

India Vs Pakistan T20 Live : KL Rahul दुर्दैवीरित्या बाद झाला, भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर माघारी परतले; Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND Vs PAK Live T20 Scoreboard : लोकेश राहुलरोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. नसीम शाहने दुसऱ्या षटकात भारताला धक्का दिला, लोकेशच्या बॅटलला लागून चेंडू यष्टींवर आदळला. 

एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार पदार्पण केले. बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर उडणाऱ्या पाकिस्तानला अर्शदीपने जमिनीवर आणले.  इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरला होता, परंतु मोहम्मद शमीने ही जोडी तोडली. त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) ३ धक्के देत भारताला कमबॅक करून दिले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील प्रेक्षकांचा उत्साह हा जगभरातील क्रीडा प्रेमींना ऊर्जा देणारा ठरला. अहमदपाठोपाठ शान मसूदने अर्धशतक पूर्ण केले आणि पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांत ९९ धावा चोपल्या.  Ind vs Pak Live T20 Match

अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम ( ०) व मोहम्मद रिझवान ( ४) हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत त्याने माघारी पाठवले. एकाच सामन्यात पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावेत बाद करणारा अर्शदीप हा जगातील पहिला गोलंदाज ठरला. पण, नंतर इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरल आणि ५० चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली.  अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अक्षरच्या एका षटकात ३ षटकारासह  २१ धावा कुटल्या. मोहम्मद शमीने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करणाऱ्या अहमदला LBW केले. हार्दिकने एका षटकात शादाब खान ( ५) व हैदर अली ( २) यांची विकेट घेतली. पुढे मोहम्मद नवाजला ( ९) त्याने बाद केले. India Vs Pakistan Live T20 Match

हार्दिकने ४-०-३०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. १७व्या षटकात अर्शदीपला पुन्हा बोलावले गेले आणि त्याने अफलातून बाऊन्सर टाकून आसीफ अलीला ( २) बाद केले.  ९१ धावांवर २ विकेट्स असणाऱ्या पाकिस्तानने पुढील २९ धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ४ षटकांत २५ धावा देत १ विकेट घेतली. शान मसूदनेही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शाहीन आफ्रिदीने १९व्या षटकात अर्शदीपला ९२ मीटर लांब षटकार खेचला. अर्शदीपने त्याच्या ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदीने ८ चेंडूंत १६ धावा चोपल्या, तर मसूद ४२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा करून चांगले कमबॅक केले. Ind vs Pak live t20 Match    

शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुल caught&bowled होता होता वाचला. लोकेश राहुल व रोहित शर्मा सावध खेळ करताना दिसले, परंतु दुसऱ्या षटकात पाकिस्तानला विकेट मिळाली. लोकेश दुर्दैवीरित्या बाद झाला. नसीम शाहने टाकलेला चेंडू लोकेशेच्या बॅट लागून पॅडवर आदळला अन् नंतर यष्टींचा वेध  घेतला. भारताला ७ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर हॅरीस रौफच्या गोलंदाजीवर रोहितचा ( ४) स्लीपमध्ये अफलातून झेल टिपला गेला. भारताने १० धावांवर दोन्ही ओपनर गमावले. Ind vs Pak Live Scoreboard



 

Web Title: India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : India lose KL Rahul early as Naseem Shah dismisses him for 4, Rohit Sharma out on 4 runs. India 10/2 vs Pakistan (159/8), Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.