IND Vs PAK Live T20 Scoreboard : अखेर तो दिवस उजाडला... ICC ने जेव्हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहते २३ ऑक्टोबरची आतुरतेनं वाट पाहू लागले. क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. लाख-दीड लाख प्रेक्षकांची उपस्थिती या महामुकाबल्यासाठी मैदानावर असणार आहे आणि सकाळपासूनच चाहते स्टेडियमबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत. रोहित शर्मा प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत युवा खेळाडू असलेला रोहित १५ वर्षांनंतर संघाचे नेतृत्व सांभाळतोय...
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार
पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास काय?ग्रुप २ मध्ये भारत-पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचाही समावेश आहे. ग्रुप २मधील पहिल्याच सामन्यात भारत-पाकिस्तान भिडणार आहेत आणि त्यामुळे आज विजेता संघ गटात टॉपर ठरेल. पण, सामना झालाच नाही तर काय? आयसीसीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी व फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. India Vs Pakistan Live T20 Match
सुपर १२मध्ये जिंकणाऱ्या संघाला दोन गुण व पराभूत संघाला शून्य गुण दिला जाणार आहे. पावसामुळे सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातील. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास दोन्ही संघांना १ गुण मिळेल आणि त्यानंतर दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित ४ सामन्यांत विजय मिळवावा लागेल. त्याचे दडपण दोन्ही संघांवर नक्की दिसेल. Ind vs Pak Live Scoreboard