Join us  

India Vs Pakistan T20 Live : भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? मेलबर्नवरून Exclusive Updates; आकाश चोप्रानेही दिली माहिती  

India Vs Pakistan Int T20 2022 Live Match Scoreboard : या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी पडणार आहे असे भाकित मेलबर्न हवामान खातं मागील आठवड्यापासून वर्तवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 9:54 AM

Open in App

IND Vs PAK Live T20 Scoreboard : अखेर तो दिवस उजाडला... ICC ने जेव्हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहते २३ ऑक्टोबरची आतुरतेनं वाट पाहू लागले. क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. पण, या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी पडणार आहे असे भाकित मेलबर्न हवामान खातं मागील आठवड्यापासून वर्तवत आहे. लाख-दीड लाख प्रेक्षकांची उपस्थिती या महामुकाबल्यासाठी मैदानावर असणार आहे. कालही मेलबर्नवर पाऊस पडल्याचे वृत्त समोर आले आहे आणि आजची तेथील परिस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे अपडेट्स हाती लागले आहेत.   Ind vs Pak Live T20 Match

पावसाचं सावट? भारत-पाकिस्तान लढत केव्हा सुरू होणार? ICC नं ट्विट करून दिली माहिती 

भारतीय संघाला मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्यात पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. यंदा सर्व काही सुरळीत वाटत असताना रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. आशिया चषक २०२२ स्पर्धेत उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. पण, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्ला आणि रोहितसाठी ती चिंतेची बात आहे.  India Vs Pakistan Live T20 Match

शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता मेलबर्न हवामान खात्यने वर्तवली होती, परंतु तुरळक पाऊस पडला. आजही असाच अंदाच चुकण्याची प्रार्थना क्रिकेट चाहते करत आहेत आणि त्यांची ही प्रार्थना पूर्ण होईल, अशी सद्यपरिस्थिती आहे. आता तरी मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सामन्यात सुरुवातीला पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दुसऱ्या इनिंग्जमध्ये पावसाचा त्रास होऊ शकतो. ९० टक्के पावसाची शक्यता आता २० टक्क्यांवर आल्याने चाहते सुखावले आहेत. आतापासूनच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर चाहत्यांची रेलचेल सुरू झाली आहे. भारताचा माजी खेळाडू व समालोचक आकाश चोप्रा यानेही महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. Ind vs Pak Live Scoreboard  मेलबर्नमध्ये मागील २० तासांत पाऊस प डलेला नाही, रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होतं, परंतु दुपारपर्यंत लख्ख प्रकाश दिसेल. सध्यातरी येथील वातावरण पाहता सायंकाळी पावसाच्या व्यत्ययानुसार IND vs PAK सामना होईल, अशी माहिती तेथे रिपोर्टिंगला गेलेल्या भारतीय पत्रकाराने दिली. India vs Pakistan T20 Int Live Match

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानपाऊसबीसीसीआय
Open in App