IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत वाईट झाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश, रोहित, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल असे चार फलंदाज ३३ धावांवर माघारी परतले. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने डावखुरा अक्षर पटेल ( Axar Patel) ला फलंदाजीला पाठवले, परंतु तो रन आऊट झाला. मात्र, तिसऱ्या अम्पायरने दिलेल्या निर्णयाने मोठा वाद सुरू झालाय...
पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम ( ०) व मोहम्मद रिझवान ( ४) हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत त्याने माघारी पाठवले. इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरल आणि ५० चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अक्षरच्या एका षटकात ३ षटकारासह २१ धावा कुटल्या. मोहम्मद शमीने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करणाऱ्या अहमदला LBW केले. हार्दिकने एका षटकात शादाब खान ( ५) व हैदर अली ( २) यांची विकेट घेतली. पुढे मोहम्मद नवाजला ( ९) त्याने बाद केले. India Vs Pakistan Live T20 Match
हार्दिकने ४-०-३०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. ९१ धावांवर २ विकेट्स असणाऱ्या पाकिस्तानने पुढील २९ धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ( १-२५) चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदीने ८ चेंडूंत १६ धावा चोपल्या, तर मसूद ४२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा करून चांगले कमबॅक केले. Ind vs Pak live t20 Match
शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुल caught&bowled होता होता वाचला. लोकेश राहुल व रोहित शर्मा सावध खेळ करताना दिसले, परंतु दुसऱ्या षटकात पाकिस्तानला विकेट मिळाली. लोकेश दुर्दैवीरित्या बाद झाला. नसीम शाहने टाकलेला चेंडू लोकेशेच्या बॅट लागून पॅडवर आदळला अन् नंतर यष्टींचा वेध घेतला. भारताला ७ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित शर्मा ( ४) व सूर्यकुमार यादव ( १५) यांना हॅरिस रौफने माघारी पाठवून पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताला तीन धक्के दिले. Ind vs Pak Live Scoreboard
सातव्या षटकात अक्षर पटेलने मारलेला चेंडू बाबर आजमच्या हाती गेला. तोपर्यंत विराटने धावसाठी कॉल दिला होता आणि अक्षरही पळाला. मात्र, विराट माघारी परतला अन् अक्षरलाही फिरावे लागले. बाबरने तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान याच्या हाती सोपवला अन् त्याने बेल्स उडवल्या. पण, या विकेटची त्यालाही खात्री नव्हती. तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली गेली आणि त्यात रिझवानचे ग्लोव्ह्ज जेव्हा यष्टींवर आदळले तेव्हा चेंडू त्याच्या हातात नव्हते. तरीही तिसऱ्या अम्पायरने अक्षरला बाद ठरवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs Pakistan T20 Worldcup 2022 live match Scoreboard : Out or not-out? Third umpire Richard Kettleborough makes a massive call, Axar is run out even though Rizwan fumbled, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.