Join us  

India Vs Pakistan T20 Live : रोहित शर्माने मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला, राष्ट्रगीत सुरू असताना रडू लागला, Video Viral

IND Vs PAK Live T20 Scoreboard :  क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 1:33 PM

Open in App

IND Vs PAK Live T20 Scoreboard :  क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. लाख-दीड लाख प्रेक्षकांची उपस्थिती या महामुकाबल्यासाठी मैदानावर असणार आहे आणि सकाळपासूनच चाहते स्टेडियमबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत. रोहित शर्मा प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत युवा खेळाडू असलेला रोहित १५ वर्षांनंतर संघाचे नेतृत्व सांभाळतोय. रोहितने मैदानावर पाऊल ठेऊन मोठा विक्रम नोंदवला, पण राष्ट्रीय गीत सुरू असताना तो प्रचंड भावनिक झालेला पाहायला मिळाला. 

 भारतीय संघाला मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्यात पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. यंदा सर्व काही सुरळीत वाटत असताना रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. आशिया चषक २०२२ स्पर्धेत उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. पण, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्ला आणि रोहितसाठी ती चिंतेची बात आहे.  Ind vs Pak Live T20 Match

 भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत. रोहितने आज मैदानावर पाऊल ठेवताच मोठा विक्रम नावावर केला. ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने २००७ ते २०२२ मध्ये खेळलेल्या ८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३४ सामन्यांत ३८.५०च्या सरासरीने  ८४७ धावा केल्या आहेत. त्यात ८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ७९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मा
Open in App