IND Vs PAK Live T20 Scoreboard : पाकिस्तानच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत वाईट झाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश, रोहित, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल असे चार फलंदाज ३३ धावांवर माघारी परतले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या डावातील एका प्रसंगामुळे रोहित शर्माचा पारा चढलेला पाहायला मिळाला. अर्धशतकवीर शान मसूद याला अर्धशतक झळकावताही आले नसते, पण टीम इंडियाचे नशीब खराब म्हणावे लागेल.
KL Rahul दुर्दैवीरित्या बाद झाला, भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर माघारी परतले; Video
पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम ( ०) व मोहम्मद रिझवान ( ४) हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत त्याने माघारी पाठवले. इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरल आणि ५० चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अक्षरच्या एका षटकात ३ षटकारासह २१ धावा कुटल्या. मोहम्मद शमीने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ३४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५१ धावा करणाऱ्या अहमदला LBW केले. हार्दिकने एका षटकात शादाब खान ( ५) व हैदर अली ( २) यांची विकेट घेतली. पुढे मोहम्मद नवाजला ( ९) त्याने बाद केले. India Vs Pakistan Live T20 Match
हार्दिकने ४-०-३०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. ९१ धावांवर २ विकेट्स असणाऱ्या पाकिस्तानने पुढील २९ धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ( १-२५) चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदीने ८ चेंडूंत १६ धावा चोपल्या, तर मसूद ४२ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा करून चांगले कमबॅक केले. Ind vs Pak live t20 Matc
नेमकं काय घडलं?आर अश्विनच्या गोलंदाजीवर शान मसूदने चेंडू हवेत टोलावला, हार्दिक पांड्याला सहज झेल घेता आला असता, परंतु चेंडू स्पायडर कॅमेराच्या वायरला लागला आणि चेंडूची दिशा बदलली. त्यानंतर रोहित शर्मा संतापला अन् डेड बॉलची मागणी करू लागला. मसूद तेव्हा ३१ धावांवर खेळत होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"