India vs Pakistan Test Series: गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना झालेला नाही. यातच T20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील यश पाहता मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) या दोन देशांमधील कसोटी सामन्याचे आयोजन करण्यची खुली ऑफर दिली आहे.
MCG च्या व्यवस्थापनावर देखरेख करणारी MCC आणि व्हिक्टोरियन सरकारने अलीकडेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना आयोजित करण्याबाबत चर्चा केली. एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक सामन्यातील शानदार यशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले आहे. या दोन देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात 90 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.
तीन सामन्यांची कसोटी मालिका ?
फॉक्सने सेन रेडिओला सांगितले की, 'एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामने खेळणे निश्चितच चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल. स्टेडियम प्रत्येक दिवशी खचाखच भरले जाईल. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यात जे वातावरण होते, असे वातावरण मी एमसीजीमध्ये यापूर्वी पाहिले नव्हते. याबाबत आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (ICC) चर्चा करावी, असे फॉक्स म्हणाले.
15 वर्षांपासून एकही मालिका झाली नाही
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरची द्विपक्षीय कसोटी मालिका 2007 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर भारत-पाक सामना फक्त आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेतच झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील चक्रात पाकिस्तान 2023 मध्ये MCG येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळणार आहे.
Web Title: India vs Pakistan Test Series: India-Pakistan Test Series soon? australia made an open offer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.