दुबई, आशिया चषक 2018 : भारताने बुधवारी पाकिस्तानला पराभूत केले. पण या सामन्यात अशी एक खास गोष्टी घडली, जी बऱ्याच लोकांनी पाहिली नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू युजवेंद्र चहलपुढे चक्क हात जोडले.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली.
पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान हा नेहमीच भारतासमोर चांगली फलंदाजी करत आला आहे. त्यामुळे त्याचा बळी भारतासाठी महत्त्वाचा होता. यावेळी भुवनेश्वरने अचूक मारा करत झमानला झेल देण्यात भाग पाडले. भुवनेश्वरला मोठा फटका मारण्याच्या नादात झमानचा झेल उडाला आणि तो झेल युजवेंद्र चहलने पकडला. यावेळी रोहित चहलजवळ धावत गेला आणि त्याने त्याच्यापुढे हात जोडले.