ठळक मुद्देआता १० वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती घडली आहे.
ललित झांबरे
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारताने सलग दुसºया दिवशी वन डे क्रिकेटमध्ये विजयाची नोंद केली. कालच (मंगळवारी) त्यांंनी हाँगकाँगवर कसाबसा का होईना, पण विजय मिळवला होता आणि आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला खडे चारले. त्यामुळे मंगळवार (१८ सप्टेंबर) आणि बुधवार (१९ सप्टेंबर) अशी सलग दुसºया दिवशी भारताच्या नावावर विजयाची नोंद झाली. भारताबाबत वन डे क्रिकेटमध्ये तिसºयांदा असे घडले आहे. तर दुसºयांदा त्यांनी लागोपाठच्या सामन्यांमध्ये हाँगकाँग व पाकिस्तानला मात दिली आहे.२००८ च्या आशिया कपमध्येसुध्दा भारताने आदल्या दिवशी हाँगकाँग़ला आणि नंतरच्या दिवशी पाकिस्तानला पराभूत केले होते. आता १० वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती घडली आहे.
भारताने लागोपाठ दोन दिवस खेळलेले सामने
दिनांक स्पर्धा प्रतिस्पर्धी भारतासाठी निकाल
१८, १९ सप्टे. २०१८ आशिया कप हाँगकाँग/ पाक विजय/ विजय
१०, ११ जाने. २०१० तिरंगी मालिका श्रीलंका/ बांग्ला विजय/ विजय
११, १२ सप्टें. २००९ कॉम्पॅक कप न्यूझी./ श्रीलंका विजय/ पराभव
२, ३ जुलै २००८ आशिया कप पाक./ श्रीलंका पराभव/ विजय
२५, २६ जून २००८ आशिया कप हाँगकाँग/ पाक विजय/ विजय
१८, १९ एप्रिल २००६ डीएलएफ कप पाक./ पाक. पराभव/ विजय
Web Title: India vs Pakistan: Win-Win 10-Year Repeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.