India Vs Pakistan, World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेने पावसामुळे सामने रद्द होण्याचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी 402 सामन्यांपैकी केवळ दोनच सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते, परंतु यंदा 18 पैकी चार सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीवरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे केवळ जगभरातील क्रिकेट चाहत्यांचेच नव्हे, तर या स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची चिंता वाढली आहे. स्थानिक हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या 100 कोटी कमावण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागू शकतो.
स्टारने या सामन्यावर 50 कोटींचा इऩ्शुरन्स काढला आहे. पण, ती संपूर्ण रक्कम मिळेलच याची खात्री नसल्याचे स्टारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.''वर्ल्ड कप स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढती महत्त्वाच्या आहेत. या सामन्यांमध्ये व्यत्यय आल्यास किंवा एकतर्फी झाल्यास त्याचा परिणाम जाहिरातींवर होतो,'' असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
(खरंच भारत-पाक सामन्यावर पाऊस पाणी फिरवणार? वाचा हवामानाचा अंदाज!)
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्टार इंडियाने जाहिरातदारांकडून बरीच रक्कम आकारली आहे. अगदी अखेरच्या क्षणी जाहिरातीचा स्लॉट बुक करण्यासाठी स्टार इंडिया 50% अधिक रक्कम आकारत आहे. 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठ 25 लाख रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्या अन्य सामन्यात दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी 16ते 18 लाख मोजावे लागत आहेत, तर अन्य सामन्यांसाठी केवळ 5 लाख मोजले जात आहेत.
(जाहिरातीतून भारताला डिवचणं पाकला पडलं महाग; पाहा व्हिडीओ)
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
(पावसाच्या बॅटिंगला सोशल मीडियाचा तडका, वाचा भन्नाट मिम्स !)
( भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल...)
(पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट)