India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर महामुकाबला होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहता पाकिस्तानला सहा प्रयत्नांत भारतावर एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे रविवारच्या या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघच बाजी मारेल असा अनेकांना विश्वास आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) या लढतीवरून पाकिस्तान संघाला डिवचण्याची संधी दवडली नाही. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला पराभवाची आठवण करून दिली आहे.
( जाहिरातीतून भारताला डिवचणं पाकला पडलं महाग; पाहा व्हिडीओ )
वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की प्रचंड तणाव हे आपसुकच येतो. केवळ या दोन देशांतीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांसाठी हा सामना पर्वणीच असतो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेनं वाट पाहतो आणि पुढील 24 तासांत चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. या सामन्यासाठी तिकिटांचा काळाबाजार सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि न्यूझीलंड हा सामना पावसामुळे वाया गेला. पण यावेळी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली समालोचन करत होता. त्यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटांचा एक किस्सा सांगितला. गांगुली म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रेझ काही वेगळीच असते. रविवारी होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची मी एका व्यक्तीला किंमत विचारली. त्यावर त्याने मला जो आकडा सांगितला, ते ऐकून मी चकितच झालो. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे एक तिकीट सध्याच्या घडीला १५०० पाऊंडला (१, ३५, ००० रुपये) मिळत आहे."
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
भारत-पाक सामन्यापूर्वी बीसीसीआयनं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बीसीसीआयनं या सामन्याचा व्हिडीओ शेअर करून पाकिस्तान समोर गुगली टाकली आहे.
पाहा व्हिडीओ...