India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान हे सख्खे शेजारी, पण पक्के वैरी रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भिडणार आहेत. दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता लागली आहे. पण, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवडाभरात वर्ल्ड कप स्पर्धेतील चार सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यात भारत-न्यूझीलंड सामन्याचाही समावेश आहे. त्यात रविवारचा सामना पाण्यात जाणार की काय, अशी भीती अनेकांना वाटत आहे.
( बीसीसीआयची पाकिस्तानसमोर गुगली; आठवण करून दिली 'ही' गोष्ट! )
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर येथील खेळपट्टीसह संपूर्ण मैदान झाकून ठेवण्यात आले होते. आता 48 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. आधीच दोन्ही संघांना पावसामुळे प्रत्येकी एक-एक लढतीत फटका बसला आहे. त्यात आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांतील खेळाडूही प्रचंड निराश होतील. हा सामना कोणत्याही परिस्थितीत खेळवण्यात यावा याकरिता ग्राऊंड स्टाफ अहोरात्र मेहनत घेत आहे. रविवारी दुपारपर्यंत तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे, परंतु तुरळक सरी पडतील. त्याचा सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
बीसीसीआयची पाकिस्तानसमोर गुगली; आठवण करून दिली 'ही' गोष्ट!भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) या लढतीवरून पाकिस्तान संघाला डिवचण्याची संधी दवडली नाही. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला पराभवाची आठवण करून दिली आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी बीसीसीआयनं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बीसीसीआयनं या सामन्याचा व्हिडीओ शेअर करून पाकिस्तान समोर गुगली टाकली आहे.
(जाहिरातीतून भारताला डिवचणं पाकला पडलं महाग; पाहा व्हिडीओ)
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
(आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले)
(पावसाच्या बॅटिंगला सोशल मीडियाचा तडका, वाचा भन्नाट मिम्स !)
( भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल...)
(पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट)