India Vs Pakistan, World Cup 2019 : रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या सामन्यात कोणता खेळाडू दमदार कामगिरी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारतीय चाहत्यांना सर्वात जास्त विश्वास कर्णधार विराट कोहलीवर आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला सर्वात जास्त पसंती देत आहेत.
मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस पडू शकतो, असे म्हटले जात आहे. पाऊस पडल्यावर वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरते. पावसानंतर जर भारताची फलंदाजी असेल तर त्यांच्यावर आमीर भारी पडू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण आतापर्यंतच्या विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आमीरने पाच विकेट्स मिळवले होते. त्यामुळे आमीरची भूमिका भारताविरुद्धच्या सामन्यात महत्वाची ठरू शकते.
आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सराव केला. त्यावेळी पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येना उपस्थित होते. त्यावेळी, तुमच्याकडे जर कोहली असेल तर आमच्याकडे आमीर आहे, अशी भावना पाकिस्तानच्या चाहत्यांच्या मनात होती. बऱ्याच प्रसारमाध्यमांना देण्यात येणाऱ्या बाईटमध्येही त्यांनी हा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
टीम इंडिया मँचेस्टरमध्ये दाखल, बीसीसीआयनं दिला Weather रिपोर्ट !
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. गेल्या आठवडाभरात पावसामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील चार सामने रद्द झाले आणि त्यात भारत-न्यूझीलंड सामन्याचाही समावेश होता. त्यात मँचेस्टर येथील हवामानाचा अंदाज घेतल्यास भारत-पाक सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे रविवारची जय्यत तयारी करून ठेवलेल्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नॉटिंगहॅम येथून मँचेस्टर येथे शनिवारी दाखल झाला.
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर येथील खेळपट्टीसह संपूर्ण मैदान झाकून ठेवण्यात आले होते. आता 48 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. आधीच दोन्ही संघांना पावसामुळे प्रत्येकी एक-एक लढतीत फटका बसला आहे. त्यात आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांतील खेळाडूही प्रचंड निराश होतील. हा सामना कोणत्याही परिस्थितीत खेळवण्यात यावा याकरिता ग्राऊंड स्टाफ अहोरात्र मेहनत घेत आहे. रविवारी दुपारपर्यंत तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे, परंतु तुरळक सरी पडतील. त्याचा सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
बीसीसीआयची पाकिस्तानसमोर गुगली; आठवण करून दिली 'ही' गोष्ट!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (बीसीसीआय) या लढतीवरून पाकिस्तान संघाला डिवचण्याची संधी दवडली नाही. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून पाकिस्तानला पराभवाची आठवण करून दिली आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी बीसीसीआयनं 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांत झालेल्या सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सामन्यात भारतानं 76 धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. शिखर धवन ( 73), विराट कोहली ( 107) आणि सुरेश रैना ( 74) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 7 बाद 300 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47 षटकांत 224 धावांत तंबूत परतला. शाहजाद अहमद ( 47), मिसबाह उल हक ( 76) व हॅरिस सोहेल ( 36) वगळता पाकच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बीसीसीआयनं या सामन्याचा व्हिडीओ शेअर करून पाकिस्तान समोर गुगली टाकली आहे.
Web Title: India vs Pakistan, World Cup 2019: 'You have virat Kohli, we have Mohammed Amir'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.