Join us  

India vs Pakistan: ये हमारी आदत है, ये चेंज करनी है हमे!; पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamनं सहकाऱ्यांसमोर जोडले हात, Video 

India vs Pakistan : पाकिस्तान संघानं १० विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवला. ट्वेंटी-२०च नव्हे तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा टीम इंडियावरील पहिलाच विजय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 1:12 AM

Open in App

India vs Pakistan : पाकिस्तान संघानं १० विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवला. ट्वेंटी-२०च नव्हे तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा टीम इंडियावरील पहिलाच विजय ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजयाचा षटकार खेचण्याचे भारताचे स्वप्न खंडित झाले आहे. या विजयानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष दिसला, पण कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) सहकाऱ्यांकडे कळकळीची विनंती केली. 

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.

बाबर आजम काय म्हणाला?हा विजय कुण्या एकाचा नव्हे, तर संघ म्हणून मिळवलेला विजय आहे. ही स्पर्धेची सुरुवात आहे आणि त्यामुळेच या विजयामुळे अतिउत्साही होऊ नका. अजून शर्यत संपलेली नाही आणि त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. आता आपण बाहेर जाऊन सोबत एंजॉय करू, पण वर्ल्ड कप जिंकण्याचे लक्ष्य आहे, त्यावरून फोकस हलायला नको. सराव सामन्यात जे केलं ते करू नका.  ये हमारी आदत है, ये चेंज करनी है हमे!, असे बाबर आजम संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये म्हणाला.

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बाबर आजमभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App