Rohit Sharma and Shubman Gill Viral Video : बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडिलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानात सराव सामन्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील दोन दिवसीय सामना अखेरच्या दिवशी प्रत्येकी ५०-५० षटकांचा करण्यात आला होता. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील विजयासह भारतीय संघानं अॅडिलेडच्या कसोटीसाठी पक्की तयारी झाल्याचे दाखवून दिले.
शुबमन फिट है बॉस!
पहिल्या सामन्याला मुकल्यानंतर रोहित शर्मा दुसरी कसोटी खेळणार हे पक्के होते, पण शुबमन गिलचं काय? हा मोठा प्रश्न होता. सराव सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी करून शुबमन गिलनं तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी फिट असल्याची झलक दाखवली.
अन् रोहितनं टीम इंडियातील प्रिन्सला मारला कोपर
भारतीय संघातील प्रिन्स अशी ओळख असलेल्या शुबमन गिलच्या दमदार अर्धशतकी खेळीशिवाय सोशल मीडियावर कॅप्टन रोहितसोबतचा डग आउटमधील त्याचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात डग आउटमध्ये कोणत्यातरी मुद्यावरुन अगदी मेजशीर अंदाजात चर्चा सुरु असल्याचे दिसते. यात हर्षित राहणाही सहभागी झाला आहे. हसत खेळत सुरु असलेल्या संवादा दरम्यान रोहित शर्मा युवा बॅटर शुबमन गिलला कोपर मारताना पाहायला मिळते.
स्वत: फ्लॉप ठरला, कॅप्टन रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर समाधानी
ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्धचा सराव सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप ठरला. पण सामन्यानंतर त्याने संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. दोन दिवसीय सराव सामन्यातील पहिला दिवस वाया जाणे हे दुर्देवी होते. पण जो वेळ मिळाला तो उपयुक्त ठरेल, असाच होता, असा उल्लेखही रोहित शर्मानं केला.
गोलंदाजीत हर्षित राणा चमकला
गुलाबी चेंडूवरील वनडे फॉर्मेटमधील सराव सामन्यात शुबमन गिलशिवायनितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार कामगिरी केली. गोलंदाजीत हर्षित राणानं चार बळी घेत, संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले
Web Title: India vs Prime Minister's XI Rohit Sharma and Shubman Gill were spotted sharing a lighthearted moment in the dugout Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.