Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

शुबमन गिलचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:52 PM2024-11-29T14:52:50+5:302024-11-29T14:53:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs Prime Minister’s XI Shubman Gill likely to play in the 2nd Day and night test against Australia | Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Shubman Gill Likely To Play In The 2nd Day And Night Test Against Australia : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्याआधी प्राइम मिनिस्टर इलेव्हन (Prime Minister’s XI) संघाविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. शनिवारी आणि रविवारी खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याआधी शुबमन गिल नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शुबमन गिल पर्थ कसोटीला मुकला होता. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून अ‍ॅडलेडच्या मैदानातील पिंक बॉल टेस्टसाठी तयार आहे, असे दिसून येते. 

शुबमन गिलचे प्रॅक्टिस सेशनमधील व्हिडिओ व्हायरल

शुबमन गिलचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात तो नेटमध्ये सराव करताना दिसून येते.  हे क्षण टीम इंडियासाठी मोठा दिलासा देणारे आहेत. तो शंभर टक्के फिट असल्याचेच या व्हिडिओतून दिसून येते. आता शनिवारी-रविवारी तो कॅनबेराच्या मैदानात प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल. तो या सामन्यात खेळताना दिसला तर प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मासह त्याची एन्ट्रीही फिक्स होईल.

टीम इंडियाची ताकद आणखी वाढेल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. पर्थ कसोटी सामन्यात रोहित आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं मोठा विजय नोंदवला. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आघाडी भक्कम करण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया अ‍ॅडलेडच्या मैदानात उतरेल. रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार हे फिक्स आहे. त्यापाठोपाठ शुबमन गिलचीही संघात एन्ट्री झाली तर टीम इंडियाची ताकद आणखी वाढेल, यात शंका नाही.

India vs Prime Minister’s XI  डे नाईट वॉर्म अप मॅच कधी?

कॅनबेरा येथील मनुका ओव्हलच्या मैदानात ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दोन दिवसांत भारतीय संघ सराव सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. प्राइम इलेव्हन विरुद्धच्या या सराव सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुरुवात होईल. या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल अन् कुणाचा पत्ता कट होईल याचे चित्रही स्पष्ट होईल.

Web Title: India vs Prime Minister’s XI Shubman Gill likely to play in the 2nd Day and night test against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.