Join us  

Suresh Raina Shikhar Dhawan : तुम्ही दिनेश कार्तिकला घेतलं, मग...!; शिखर धवनला संघात का घेतले नाही?, सुरेश रैनाने विचारला जाब

India vs SA T20I : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ सुरू असताना काल अचानक BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:53 PM

Open in App

India vs SA T20I : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ सुरू असताना काल अचानक BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. ९ जूनपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. रविवारी BCCI ने हा संघ जाहीर केला, त्यात रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांचे संघात पुनरागमन हे चाहत्यांना सुखावणारे आहे. हार्दिक आयपीएल २०२१ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संघात परतला आहे. पण, शिखर धवन ( Shikhar Dhawan) याची निवड न होणे, अनेकांना पटलेलं नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मागील दौऱ्यावर धवनने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. 

राहुल द्रविडच्या निर्णयामुळे शिखर धवनचे ट्वेंटी-२० करियर संपुष्टात; जाणून घ्या प्रकरण

शिखर धवनची निवड करण्यात न आल्याने भारताचा माजी अष्टपैलू सुरेश रैना ( Suresh Raina) नाराज झाला आहे आणि त्याने त्यामागचं कारण विचारलं आहे. धवन सातत्याने धावा करतोय आणि प्रत्येक कर्णधारा हवा असलेला खेळाडू तो आहे, असा दावा रैनाने केला. ''शिखर धवनही निराश झाला असेल. त्याच्यासारखा खेळाडू प्रत्येक कर्णधाराला हवा असतो. तो खूप गमतीशीर माणूस आहे आणि ज्याने संघातील वातावरण हसतंखेळतं राहतं. तो सातत्याने धावाही करतोय, मग तो स्थानिक क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय असो किंवा ट्वेंटी-२०. जर तुम्ही दिनेश कार्तिकला संघात घेताय, तर मग धवनही संघात हवा होता. मागील ३-४ वर्ष तो सातत्याने धावा करतो,''असे रैना म्हणाला. 

हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ची घोषणा

आयपीएलमध्ये त्याने  सलग सात पर्वांत ४००+ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२मध्ये त्याने १४ सामन्यांत ४६० धावा करून पंजाब किंग्सकडून सर्वधिक धावा करणारा फलंदाज आहे.  

 राहुल द्रविडच्या निर्णयामुळे शिखर धवनचे ट्वेंटी-२० करियर संपुष्टात 

बीसीसीआयची रविवारी बैठक पार पडली, त्यात राहुल द्रविड, निवड समितीचे सदस्य आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात होतकरू खेळाडूंवर चर्चा करण्यात आली. यावेळी राहुल द्रविडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन संघाने युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी असे, BCCI चे सचिव जय शाह यांना सांगितले. त्यानुसार शिखऱ धवनला न निवडण्याचा निर्णय हा राहुल द्रविडने घेतला, निवड समतीने नाही. द्रविडने स्वतः धवनला याबाबत सांगितले. 

''दशकाहून अधिक काळ शिखर धवनने भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे, परंतु ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी  करणाऱ्या युवकांना संधी देण्याची गरज आहे. राहुल द्रविडने हा निर्णय घेतला आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. रविवारी संघ जाहीर करण्यापूर्वी द्रविडने स्वतः धवनला हा निर्णय सांगितला,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने  InsideSport.IN ला सांगितले. 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनदिनेश कार्तिकसुरेश रैना
Open in App