IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली

India vs SL 1st T20I live Updates Score Today : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:48 PM2021-07-25T20:48:59+5:302021-07-25T20:49:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs SL 1st T20I :  Avishka Fernando was very very excited with that catch, Turns out that the ball bounced before | IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली

IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs SL 1st T20I live Updates Score Today : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. दुष्मंथा चमिरानं टाकलेला पहिलाच चेंडू इतक्या जलदगतीनं वळला की पृथ्वीला काही समजण्यापूर्वीच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावला होता. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी टीम इंडियाला धक्का दिला. संजू सॅमसन व शिखर धवन यांनी अर्धशतकी भागीदारी करून चांगले फटके मारले. पण, सॅमसनला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेली चिटिंग समोर आली आणि त्यांचा आनंदाचा फुगा लगेच फुटला. 

भारताकडून ट्वेंटी-20त पदार्पण करणारा पृथ्वी युवा फलंदाज ठरला. त्यानं 21 वर्ष व 258 दिवसांचा असताना पदार्पण केले. कसोटीत विजय मेहरा ( 17 वर्ष व 265 दिवस) आणि वन डेत पार्थिव पटेल ( 18 वर्ष व 317 दिवस) यांच्या नावावर हा विक्रम आहे. ट्वेंटी-20त पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पृथ्वी हा लोकेश राहुल ( वि. झिम्बाब्वे, 2016) याच्यानंतरचा दुसरा सलामीवीर ठरला, तर ट्वेंटी-20 पदार्पणात शून्यावर बाद होणारा धोनी व राहुल यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला.  


सामन्याच्या पाचव्या षटकात इसुरू उदानाच्या गोलंदाजीवर सॅमसननं कव्हरवर मारलेला फटका अविष्का फर्नांडोनं टिपला अन् सॅमसन बाद असल्याची अपील करत जल्लोष करू लागला. श्रीलंकेचे सर्व खेळाडू विकेट मिळाली म्हणून एकत्र आले, परंतु सॅमसन खेळपट्टीवरच उभा राहिला. त्यामुळे मैदानावरील अम्पायरला तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली. त्यात चेंडू फर्नांडोच्या हाती जाण्यापूर्वी पुढे टप्पा पडला होता. मोठ्या स्क्रीनवर हा रिप्ले दिसताच श्रीलंकेच्या आनंदावर विरझण पडले. पुढच्याच षटकात सॅमसननं खणखणीत षटकार खेचला. पण, सातव्या षटकात वनिंदू हसरंगानं त्याला पायचीत पकडले. सॅमसन 20 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 27 धावांवर बाद झाला. 

Web Title: India vs SL 1st T20I :  Avishka Fernando was very very excited with that catch, Turns out that the ball bounced before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.