IND Vs SL 1st T20I Live : राहुल द्रविडनं दोन खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, टीम इंडियानं गमावली नाणेफेक!

India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:42 PM2021-07-25T19:42:26+5:302021-07-25T19:43:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs SL 1st T20I live Updates Score Today : Prithvi Shaw and Varun Chakravarthy debutants for India, Sri Lanka have won the toss | IND Vs SL 1st T20I Live : राहुल द्रविडनं दोन खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, टीम इंडियानं गमावली नाणेफेक!

IND Vs SL 1st T20I Live : राहुल द्रविडनं दोन खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, टीम इंडियानं गमावली नाणेफेक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची ही अखेरची ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे आणि त्यामुळेच कर्णधार शिखर धवनसह युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरीसाठी सज्ज आहेत. वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पाच नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आणि आता ट्वेंटी-20 मालिकेतही पहिल्याच सामन्यात दोन खेळाडू पदार्पण करत आहेत. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. 

IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

कोलकाता नाइट रायडर्सच्या वरुण चक्रवर्थीला याआधी दोन वेळा टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती, परंतु तंदुरुस्ती चाचणीत तो अपयशी ठरला. यावेळी तसे झालेले नाही आणि आजच्या सामन्यात तो टीम इंडियाकडून पदार्पण करत आहे. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2-1 अशा फरकानं वन डे मालिका जिंकली आणि आता ट्वेंटी-20 क्लीन स्वीप देण्याचा गब्बर अँड सेनेचा निर्धार आहे. तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेचे मनोबल नक्कीच उंचावले असेल आणि त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळणे अपेक्षित आहे. पृथ्वी शॉ यानेही आजच्या सामन्यातून टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले आहे. ( Prithvi Shaw and Varun Chakravarthy handed maiden India T20I caps. So two debutants for India) 

आजच्या सामन्यातही सलामीची जबाबदारी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या खांद्यावर असेल, तर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांचे स्थान पक्के आहे. मनीष पांडेला वन डे मालिकेत संधीचं सोनं करण्यात अपयश आलं आणि त्यामुळे त्याला ट्वेंटी-20त संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात संजू सॅमसनला मैदानावर उतरवले गेले आहे. कुलदीप यादवच्या जागी वरुणला संधी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार आणि  दीपक चहर यांच्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी आहे. ऋतुराज गायकवाड व देवदत्त पडिक्कल यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.    

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, वरूण चक्रवर्थी, युजवेंद्र चहल ( India's playing XI for the first T20i against Sri Lanka: 1. Shikhar Dhawan (C).2. Prithvi Shaw.3. Suryakumar Yadav.4. Ishan Kishan.5. Hardik Pandya.6. Sanju Samson (WK).7. Krunal Pandya.8. Bhuvneshwar Kumar.9. Deepak Chahar.10. Yuzvendra Chahal.11. Varun Chakravarthy.) 
 

Web Title: India vs SL 1st T20I live Updates Score Today : Prithvi Shaw and Varun Chakravarthy debutants for India, Sri Lanka have won the toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.