India vs SL 1st T20I live Updates Score Today : पहिल्या चेंडूवर विकेट पडूनही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. कर्णधार शिखर धवन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी चांगली फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याकडून अखेरच्या षटकांत टोलेबाजी खेळी पाहण्याची अपेक्षा होती, परंतु त्याचा बॅट अन् बॉलशी संपर्कच होत नव्हता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिकचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला.
पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. दुष्मंथा चमिरानं टाकलेला पहिलाच चेंडू इतक्या जलदगतीनं वळला की पृथ्वीला काही समजण्यापूर्वीच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावला होता. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी टीम इंडियाला धक्का दिला. ट्वेंटी-20त पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पृथ्वी हा लोकेश राहुल ( वि. झिम्बाब्वे, 2016) याच्यानंतरचा दुसरा सलामीवीर ठरला, तर ट्वेंटी-20 पदार्पणात शून्यावर बाद होणारा धोनी व राहुल यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 1st T20I, Ind vs SL 2021 Live Score
सामन्याच्या पाचव्या षटकात इसुरू उदानाच्या गोलंदाजीवर सॅमसननं कव्हरवर मारलेला फटका अविष्का फर्नांडोनं टिपला अन् सॅमसन बाद असल्याची अपील करत जल्लोष करू लागला. पण, चेंडू फर्नांडोच्या हाती जाण्यापूर्वी पुढे टप्पा पडला होता. सातव्या षटकात वनिंदू हसरंगानं त्याला पायचीत पकडले. सॅमसन 20 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 27 धावांवर बाद झाला. शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 36 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केले. सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या धवननं फटकेबाजीला सुरुवात केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरून धवनला माघारी जावं लागलं. त्याने 36 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 46 धावा केल्या. Ind vs SL 2021 Live Updates, IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today