India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची ही अखेरची ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे आणि त्यामुळेच कर्णधार शिखर धवनसह युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरीसाठी सज्ज आहेत. वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पाच नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आणि आता ट्वेंटी-20 मालिकेतही प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा खेळाडू पाहायला मिळतील, अशी आशा आहे. आजच्या सामन्यात सर्वाधिक चर्चा आहे ती मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्थी याची...
कोलकाता नाइट रायडर्सच्या वरुण चक्रवर्थीला याआधी दोन वेळा टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली होती, परंतु तंदुरुस्ती चाचणीत तो अपयशी ठरला. यावेळी तसे झालेले नाही आणि आजच्या सामन्यात तो टीम इंडियाकडून पदार्पण करू शकतो. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2-1 अशा फरकानं वन डे मालिका जिंकली आणि आता ट्वेंटी-20 क्लीन स्वीप देण्याचा गब्बर अँड सेनेचा निर्धार आहे. तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेचे मनोबल नक्कीच उंचावले असेल आणि त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळणे अपेक्षित आहे.
आजच्या सामन्यातही सलामीची जबाबदारी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या खांद्यावर असेल, तर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांचे स्थान पक्के आहे. मनीष पांडेला वन डे मालिकेत संधीचं सोनं करण्यात अपयश आलं आणि त्यामुळे त्याला ट्वेंटी-20त संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात संजू सॅमसनला मैदानावर उतरवले जाऊ शकते. कुलदीप यादवच्या जागी वरुणला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर खेळतील. ऋतुराज गायकवाड व देवदत्त पडिक्कल यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पड़ सकता है.
कशी असेल प्लेइंग इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, वरूण चक्रवर्थी, युजवेंद्र चहल