IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. सूर्यकुमार यादवनं वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् श्रीलंकेचा संघ निर्धात होऊन, विजय आपलाच असा बागडू लागला. पण, दीपक चहरनं त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवला. त्यानं वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह संघर्ष केला. प्रचंड दडपणातही चहरनं अफलातून खेळी केली. ४७व्या षटकात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले, तरीही त्यानं संघर्ष केला. ७ बाद १९३ वरून दीपक-भुवीनं सामना खेचून आणला. या दोघांमुळे श्रीलंकेच्या ताफ्यात 'कभी खूशी, कभी गम' असे वातावरण झाले.
अविष्का फर्नांडो ( ५०) आणि मिनोद भानूका ( ३६) यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. धनंजया डी सिल्व्हा ( ३२), चरिथ असलंका ( ६५) आणि चमिका करुणारत्ने ( ४४*) यांनी श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण, तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू वनिंदू हसरंगानं त्याचा त्रिफळा उडवला. पृथ्वीला १३ धावांवर माघारी जावं लागलं. इशान किशनही ( १) फेल ठरला. मनिष पांडे व शिखर यांनी सावध खेळ करताना टीम इंडियाची धावसंख्या हलती ठेवली. पण, वनिंदूनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला, त्यानं धवनला २९ धावांवर पायचीत पकडले. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd ODI
४७च्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षकाकडून भुवीचा झेल सूटला अन् चेंडू सीमापार गेला. भारताला २४ चेंडूंत २९ धावा हव्या होत्या आणि तेव्हा हा चौकार मिळाला. मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं दीपकनं प्रथोमचार घेतले, परंतु संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. अखेरच्या तीन षटकांत संघाला १६ धावा हव्या होत्या. ४८व्या षटकात केवळ एक धाव घेता आली. वनिंदू हसरंगानं १० षटकांत ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत १५ धावांची गरज असताना भुवीनं पहिल्या चेंडूवर एक धाव काढली अन् दीपकनं पुढच्या चेंडूवर चौकार खेचला. अखेरच्या षटकात टीम इंडियानं विजयासाठी असलेल्या ३ धावा सहज काढल्या. दीपकनं ८२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. भुवीनं नाबाद १९ धावा करून त्याच्यासह ८व्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today, IND VS SL Live 2nd ODI