Join us  

IND Vs SL 2nd ODI Live : दुर्दैवी मनिष पांडे, विचित्र पद्धतीनं झाला बाद; जीवदान मिळूनही हार्दिक पांड्या 'भोपळ्या'वर माघारी!

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 9:07 PM

Open in App

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला आहे. संघातील स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मनिष पांडे दुर्दैवीरित्या माघारी परतला, त्यानंतर हार्दिक पांड्याही भोपळा न फोडताच बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. 

अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानूका यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या.  युजवेंद्र चहलनं सलग दोन चेंडूंत मिनोद ( ३६) व भानुका राजपक्ष ( ०) यांना बाद केले. अविष्का आणि धनंजया डी सिल्व्हा यांनी लंकेचा डाव सावरला. अविष्कानं ७१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले अन् भुवनेश्वर कुमारनं ही महत्त्वाची विकेट घेतली. त्यानंतर दीपक चहरनं श्रीलंकेचा सेट फलंदाज धनंजया ( ३२) याला बाद केले. या दोन महत्त्वाच्या विकेट्सनंतर श्रीलंकेच्या धावांचा वेग मंदावला. कर्णधार दासून शनाका ( १६) याला चहलनं बाद केले. चरिथ असलंका आणि चमिका करुणारत्ने या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. असलंका ६८ चेंडूंत ६ चौकारांसह ६५ धावांत माघारी परतला. करुणारत्नेनं श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. करुणारत्ने नाबाद ४४ धावा केल्या.  Ind vs SL 2021 2nd ODI, Ind vs SL 2021 Live Score

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉशिखर धवन यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पृथ्वीनं श्रीलंकेचा गोलंदाज कसून रजिथाच्या एका षटकात सलग तीन खणखणीत चौकार खेचले. पण, तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू वनिंदू हसरंगानं त्याचा त्रिफळा उडवला. हसरंगानं टाकलेला चेंडूची उसळी कमी राहिली अन् पृथ्वीचा कट मारण्याचा प्रयत्न चुकला. पृथ्वीला १३ धावांवर माघारी जावं लागलं. इशान किशनही फेल ठरला. रजिथानं टाकलेला बाहेर जाणाऱ्या चेंडूला मारलेला फटका बॅटची कड घेऊन यष्टिंवर आदळली. इशान १ धावेवर बाद झाला. मनिष पांडे व शिखर यांनी सावध खेळ करताना टीम इंडियाची धावसंख्या हलती ठेवली. पण, वनिंदूनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला, त्यानं धवनला २९ धावांवर पायचीत पकडले.  Ind vs SL 2021 Live Updates, IND Vs SL 2021 मनिष पांडे व सूर्यकुमार यादव यांनी झटपट खेळी करताना धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मनिष चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु दुर्दैवीरितीनं त्याला माघारी जावं लागलं. शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण शनाकाच्या हाताला लागून तो नॉन स्ट्रायकर एंडला यष्टींवर आदळला. मनिष क्रिजच्या बाहेर आला होता आणि तिसऱ्या अम्पायरनं त्याला बाद ठरवले. त्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याचा रिटर्न कॅच शनाकाकडून सुटला. मनिष ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ धावांवर बाद झाला. IND VS SL Live ODI Match Today, IND VS SL Live 2nd ODI  

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवशिखर धवनपृथ्वी शॉ